Pune Video : १९ फेब्रुवारीला दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. या दिवशी शिवभक्त उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहतात. काही लोकं गड किल्ल्यांना भेट देतात तर काही लोकं ढोल ताशाच्या गजरात महाराजांची मिरवणूक काढतात. काही तरुण मंडळी शिवजयंतीला डिजे लावून महाराजांच्या गाण्यावर डान्स करताना दिसतात सध्या याचे प्रमाण खूप वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर एका तरुणाने एका पोस्टरवर असे काही लिहिलेय की ते पाहून तुम्हालाही वाटेल, हे शंभर टक्के खरे आहे. या तरुणाने डिजेवर नाचणाऱ्या तरुणांना उद्देशून एक संदेश लिहिलाय. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील आहे. एक तरुण एफसी रोडवर हातात पोस्टर घेऊन उभा आहे. त्या पोस्टरवर त्याने असे काही लिहिलेय की ते पाहून लोकांनाही ते पटलेले दिसत आहे. त्या तरुणाने या पोस्टरवर लिहिलेय, “महाराज नाचून नाही तर वाचून कळतात” अनेक जण त्याच्या हातातील पोस्टर पाहून त्याला भेटायला आले आणि हस्तांदोलन केले. काही लोकांनी त्याच्या शेजारी जाऊन फोटो काढलेत. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यापूर्वी सुद्धा हातात पोस्टर धरुन संदेश सांगणाऱ्या अशा अनेक तरुणांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा : भररस्त्यात लावण्यात आले असे साइनबोर्ड, की वाचून गोंधळात पडले लोक; म्हणाले, “वैतागलेले ड्रायव्हर्स…”

a_poetic_storyteller या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माफ करा महाराजा तुम्हाला मिरवण्याच्या नादात मुरवून घ्यायचं राहिलं !” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी घोड्यावरून प्रसंगी चालत,धावत सह्याद्री पालथा घातला होता.. आणि आताचे स्वतः ल शिवभक्त समजणारे एसी लावून कार मधून, बुलेट वरून मिरवणुका काढतात..अरे किमान तो एक दिवस तरी पायी चाला रे..” तर एका युजरने लिहिलेय, “महाराज आपले दैवत आहेत..आणि त्यांचा सण हा डिजे लावून का करायचा…आपली परंपरा काय आहे याचा तरी भान ठेवा.. जे खरे शिवभक्त आहेत ते ढोल ताशा लेझिम घेऊन आपली संस्कृती जपणारं” आणखी एका युजरने लिहिलेय, “कडू पण सत्य”