सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत अनेकदा वाहन चालक स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकतात. अशाच एका अपघाताचा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रातील पुण्यात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. मुंबई-पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे.

पुण्यातील वर्दळीच्या मुंबई-वाकड लेक महामार्गावर एका कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्यावर पडतो. पण, सुदैवाने या अपघातात दोन्ही स्वार गंभीर जखमी झाले. ही घटना एका कारच्या डॅशकॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये कैद झाला थरारक अपघात

वाकड परिसरातील टिप-टॉप इंटरनॅशनल हॉटेलजवळ हा थरारक अपघात झाला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, “भरधाव वेगाने येणारी काळ्या रंगाच्या सेडान कारने बाईकला जोरदार धडक देते. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीस्वार आणि त्याच्यामागे बसलेला व्यक्ती काही फूट दूर फेकले जाता. दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर होतो. अपघातानंतर जखमी व्यक्ती उठून दूभाजकावर जाऊन बसतो. अपघातानंतर लोक त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी जमलेले दिसतात.

सेडान चालकाची भरधाव वेगात कार चालवणे आणि संपूर्ण अपघात दुसर्‍या कारच्या डॅशकॅममध्ये कैद झाली. सुदैवाने त्या कारचा अपघात झाला नाही. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि पोलिसांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चूक कोणाची? नेटकऱ्यांमध्ये पेटला वाद

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. एकाने कमेंट केली की,”हेल्मेटचा स्ट्रॅप नाही लावला तर हेल्मेटचा शुन्य फायदा आहे.” दुसऱ्याने म्हटले की, अशा बेसावध कार चालकावर व त्याच्या मालकावर कठोरात कठोर कारवाई करा आणि त्याची गाडी जप्त करा. कोणाचा जीव गेला तरी त्यांना त्याच्याशी काही घेणे देणे नाही, त्यांची वागणे कधीच बदलणार नाही.” तिसऱ्याने कमेंट केली की,” बाईकवाले कसेही गाडी चालवतात, स्वतःचा रस्ता असल्यासारखा, ज्यांच्यामुळे असे अपघात होतात.” आणखी एकाने म्हटले,”मला माहित आहे 100% चुक कारचालकाची आहे पण स्कूटीवाला बागेत गाडी चालवत आहे का?”