Pune News : सध्या सगळीकडे पावसाने थैमान घातले आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. अशात पाऊस पडला की पुण्यात ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. पुण्यात एवढी वाहतूक कोंडी होते की पाहून कोणालाही संताप येईल. सोशल मीडियावर वाहतूक कोंडीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोक पुण्याच्या वाहतूक कोंडीविषयी आपले अनुभव सुद्धा सांगतात. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एक तरुण त्याचा अनुभव सांगतो. त्याच्याबरोबर नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्याची पोस्ट पाहावी लागेल.

या पुणेकर तरुणाने सोशल मीडियावर पुण्याच्या ट्रफिकची विषयी सांगितले. त्याने एक्सवर पोस्ट करत लिहिलेय, “मी माझ्या मैत्रीणीला एअरपोर्टला सोडायला गेलो कारण ती दुबईला जात होती. ती दुबईला पोहचली पण मी अजुनही पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकलोय” याचा अर्थ त्याची मैत्रीण दुबईला पोहचली पण तो ट्रॅफिकमुळे घरी पोहचलाच नव्हता. त्याने या कॅप्शनसह पुण्यातील ट्रॅफिकचा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. या फोटोमध्ये वाहनांची भली मोठी रांग दिसत आहे. हे ट्रॅफीक पाहून कोणीही डोकं धरेल. सध्या या तरुणाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल पोस्ट

Being Punekar या अकाउंटवरून या तरुणाने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “तुम्ही सहा तास ट्रॅफिकमध्ये अडकला होता. जर तुझ्या मैत्रीणीला फ्लाइटच्या दोन तासाआधी सोडले आणि तिला दुबईत पोहचायला ३.३० तास लागले.” तर एका युजरने लिहिलेय, “भावनांना समजून घ्या” आणखी एका युजरने लिहिलेय, “असे माझ्याबरोबर पण घडले आहे. मी नागपूरहून पुण्याला ७०० किमीचा प्रवास १ तास १० मिनिटात केला आणि १५ मिनिटे एअरपोर्टच्या बाहेर पडायला लागले आणि माझ्या आईला घरापासून एअरपोर्टपर्यंतचा २७ किमीचा प्रवास करायला १ तास ४० मिनिटे लागली” एक युजर लिहितो, “अजून काही दिवस थांबा. परिस्थिती यापेक्षा भयंकर होणार आहे.” तर एक युजर लिहितो, “पुणे २०२१ पर्यंत चांगले शहर म्हणून ओळखले जायचे. मेट्रोने जेव्हा रस्त्यांची जागा घेतली, आणखी ट्रॅफिक वाढले.” अनेक युजर्सनी ट्रॅफिकविषयीचे त्यांचे अनुभव सांगितले. काही युजर्सनी वाढत्या ट्रॅफिकमागील कारणे सुद्धा सांगितली आहेत.