Railway Station Viral video : रेल्वेने प्रवास करताना अनेकदा खूप भूक लागते. अशा वेळी आपण रेल्वेस्थानकावरील दुकानातून कुरकुरे, वेफर्स खरेदी करतो; पण पोट भरण्यासाठी म्हणून काही जण चटपटीत भेळ वडापाव, हल्ली तर सँडविचही विकायला येतात आणि आपण पौष्टीक म्हणून विकतही घेतो. जर तुम्हीही अशा प्रकारे ट्रेनमध्ये विकायला येणार खाद्यपदार्थ खात असाल, तर व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहाच. कारण- या व्हिडीओतून असा काही किळसवाणा प्रकार दाखविला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही यापुढे ट्रेनमध्ये काहीही विकत घेऊन खाताना पुन्हा १०० वेळा विचार कराल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

रेल्वेस्थानकावरील खाद्यविक्रेते अनेकदा बरेचसे पदार्थ गलिच्छ पद्धतीने बनवून ते प्रवाशांना विकत असल्याचे व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने सँडविचही खरेदी केले आहे. पण ते सँडविच पाहायल्यावर तरुणी हैराण झाली आहे. तिला केवळ ब्रेडच मिळाला आहे. त्यामध्ये टोमॅटो आणि चटणी देखील आहे, पण कमी प्रमाणत. आता ते किती हे तुम्हाला व्हिडिओ पाहून समजेलच. व्हिडिओमध्ये तुम्ही तरुणी सॅन्डविच दाखवताना पाहू शकता.

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्काही बसेल आणि हसूही आवरणार नाही. एवढंच नाहीतर ब्रेडला चटणी लावलीय की हिरवा रंग यावरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.अशा प्रकारे हे पदार्थ आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. त्यामुळे रेल्वेस्थानकावर काहीही खाण्यापूर्वी वा खाताना जरा विचार करा. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @blushnvibe.s या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तरुणीने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सॅन्डविचमध्ये चटणी नाही, तर केवळ ग्रीन कलर होता असे लिहिले आहे. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय की, “बाहेरचं तर अजिबातच खाऊ नका. वाटलेच तर, घरी बनवून खा. बाहेरचं खाणं आणि मुलांना देणं चांगलं नाहीये. सर्वच वडापाव दुकानांवर आणि इतर ठिकाणीही हाच प्रकार आहे.”तर आणखी एकानं, “आता काय जीवच घेणार का” अशी प्रतिक्रिया दिली आहे.