महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे श्वानांप्रती असलेले प्रेम संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. राज ठाकरे यांच्याकडे जेम्स नावाचे श्वान होते. त्याच्यावर त्यांचा खूप जीव होता. गेल्याच वर्षी त्याचे निधन झाले. यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः स्मशानभूमीत जाऊन आपल्या लाडक्या जेम्सला शेवटचा निरोप दिला होता. जेम्सच्या निधनानंतर राज यांच्याकडे मुस्तफा आणि ब्लू या नावाचे दोन श्वान आहेत.

सध्या राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संथांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पुनर्बांधणीच्या निमित्ताने राज ठाकरे या दौऱ्यावर निघाले आहेत. विदर्भ एक्सप्रेस या ट्रेनने ते रवाना झाले असून त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना एक नवा मित्र भेटला आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अ‍ॅपलचे वेड! IPhone 14 Pro खरेदीसाठी त्याने गाठली दुबई; तिकीटाच्या पैशात आले असते दोन भन्नाट फोन

विदर्भ एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना काही पोलीस तपासणीसाठी राज ठाकरे यांच्या कोचमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्याबरोबर लॅब्राडोर प्रजातीचे श्वानही होते. या श्वानाला पाहून राज ठाकरे खुश झाले आणि त्यांनी त्याला आपल्या शेजारी बसवून घेतलं. ते त्याच्यासह बराचवेळ खेळले आणि त्यांनी त्याचे लाडही केले. तसेच, त्यांनी पोलिसांकडे या श्वानाची चौकशीही केली.

प्रेयसीनं ब्रेकअप केल्यानंतर तिला मनवण्यासाठी मुलानं केलं असं काही… Viral Video पाहून आवरणार नाही हसू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे यांनी आपुलकीने या श्वानाची चौकशी केली. ‘त्याला वेळेलावर जेवण देता ना? त्याचे लाड करता ना? त्यांना नीट आराम मिळतो ना?’ असे प्रश्नही यावेळी त्यांनी पोलिसांना विचारले. त्याचबरोबर श्वानाची काळजी घेताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत, याबद्दल त्यांनी पोलिसांना थोडक्यात सूचनाही केल्या. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांना तो फारच आवडला आहे. ते या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही देत आहेत.