Woman Put Cobra Snake On Neck: साप दिसला की अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचीच पळापळ होते, सापाच्या नादाला लागण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही. मात्र राजस्थानमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका महिलेच्या घरात साप दिसल्यानंतर सर्व घाबरले मात्र, ती महिला सापाला खांद्यावर घेऊन फिरु लागली. साप म्हणजे माझा मुलगा आहे, माझ्या मुलानं सापाच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे असं ती सर्वांना सांगू लागली. महिला आणि घरातील इतर सदस्य सापाला दूध पाजू लागले, हे एकून मोठ्या संख्येने लोक महिलेच्या घरी गर्दी करु लागले. मात्र हे सगळं सुरु असताना दोनच दिवसात जे घडलं ते एकून तुम्हालाही धक्का बसेल.

राजस्थानमधील कोटा येथील एका गावातील घरात नाग शिरला. घरातील सर्वजण घाबरले आणि सापाला मारण्याच्या तयारीत होते पण ६५ वर्षाच्या बदाम बाई आल्या आणि सगळ्यांना सापाला मारण्यापासून रोखले. महिलेने सापासमोर हात जोडून सांगितले की, तू जर माझा मुलगा असशील तर माझ्या मांडीवर येऊन बस. यानंतर साप महिलेच्या मांडीवर येऊन बसला.

सापाच्या रुपात मुलगा आला

महिलेच्या म्हणण्यानुसार साप हा तिचा मलगाच आहे, मुलगा सापाच्या रुपात परत आला आहे. तसेच महिलेने सांगितले की तो रात्री झुडपात गेला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आला होता. नंतर त्याला दूध पाजण्यात आले, हळूहळू त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आणि मोठ्या संख्येने लोक घरी पोहोचू लागले. मात्र, या सापाच्या मृत्यूची बातमी दोन दिवसांनंतर समोर आली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “तू खूप सेक्सी आहेस”, भर बाजारात रशियन तरुणीसोबत तरुणाचं गैरवर्तन, संतापजनक VIDEO व्हायरल

महिलेच्या मुलाचे १५ वर्षापूर्वी निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका व्यक्तीने सांगितले की, १५ वर्षांपूर्वी महिलेचा मुलगा हंसराज वयाच्या २५ व्या वर्षी मरण पावला होता. घरात साप दिसल्यावर त्या महिलेने तो आपला मुलगा असल्याचे मान्य केले आणि त्याचा पुनर्जन्म झाला असे सांगितले. सापाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता या सापाचा आणि महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.