Shopkeeper Secreat Rakhi Marketing Video : रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठांमध्ये महिलांची मोठी गर्दी दिसतेय. नवनवीन रंगाच्या, डिझाइन्सच्या राख्यांनी अनेक दुकानं सजलीत. या राख्यांच्या खरेदीसाठी महिलांची लगबग दिसून येतेय. त्यात पारंपरिक राख्यांपासून वेगवेगळ्या ट्रेंडच्या अनेक राख्या बाजारपेठेत आल्यात, ज्या अगदी दोन ते २०० रुपयांपर्यंत विकल्या जातायत. त्यातच राखी विक्रेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात त्यानं अगदी दोन रुपयांच्या राखीतून जवळपास ४० ते १०० रुपयांपर्यंतचा नफा कसा कमावला जातो याचं टॉप सीक्रेट सांगितलं आहे,. जे ऐकून तुम्हीही डोकंच धराल.

व्हिडीओमध्ये एका राखी विक्रेत्यानं २दोन रुपयांची राखी ग्राहकांना ५० रुपयांना कशी विकली जाते याचं टॉप सीक्रेट सांगितलं आहे, ज्यातून तो भरघोस कमाई करतोय. विक्रेता व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाला राखीतून कशी मोठी कमाई करता येते याचं सीक्रेट सांगतोय.

पॅकेजिंगमधून कमवा भरपूर नफा

व्हिडीओमध्ये एक राखी विक्रेता दाखवतोय की, राखीविक्रीचा संपूर्ण खेळ हा पॅकेजिंगमध्ये दडलेला आहे. फक्त चांगले पॅकेजिंग करून तुम्ही दोन रुपयांची राखी १० ते ५० रुपयांना कशी विकू शकता हे त्यानं सांगितलं. त्यासाठी विक्रेत्यानं सर्वप्रथम दोन रुपयांची राखी एका पॅकिंग शीटमध्ये पॅक केली. मग त्या राखीची किंमत १० रुपये झाली. त्यानंतर त्यानं तीच राखी आणखी चांगल्या रीतीनं पॅक केली, म्हणजे एका पारदर्शी बॉक्समध्ये पॅक केली, ज्यामुळे तिची किंमत आता ५० रुपये झाली.

तुमची पॅकेजिंग जितकी चांगली असेल तितकी तुमच्या राखीची किंमत वाढून, ती महाग विकली जाते. त्यानंतर त्यानं १० रुपयांची राखी एका मोठ्या पारदर्शी बॉक्समध्ये पॅक केली. आता ती सहज १०० रुपयांना विकली जाईल. त्याच वेळी त्यानं २० रुपयांची राखी एका स्टायलिश बॉक्समध्ये पॅक केली आणि तिची किंमत २०० रुपये असल्याचे सांगितले.

राखीविक्रीचा हा सीक्रेट जुगाड व्हिडीओ @jasveersinghvlogs नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला. राखीतून कमाईचा हा जुगाड अनेकांना चांगलाच आवडला आहे. तर अनेकांनी ही ग्राहकांची निव्वळ फसवणूक असल्याचे म्हणत टीकाही केली आहे.

राखीतून पैसा कमावण्याचा भन्नाट जुगाड

“ग्राहकही ही रील पाहतात” युजर्सची कमेंट

एका युजरनं लिहिलं की, ग्राहकही ही रील पाहतात. दुसऱ्यानं म्हटलं की, पॅकिंग हा व्यवसायाचा खरा राजा आहे. तिसऱ्यानं लिहिलं की, १० रुपयांची राखी १०० रुपयांना कोण खरेदी करेल. ग्राहक वेडे नाहीत, त्यांना सर्व काही माहीत आहे. तिसऱ्यानं लिहिलं की, भावा, मी बॉक्समध्ये पॅक केलेली राखी आता खरेदी करणार नाही.