आजच्या तरुण पिढीमध्ये कोरियन ड्रामा आणि कोरिअन पॉप म्युझिकची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. त्याबरोबर कोरियन स्किन केअर, कोरिअर खाद्यपदार्थ आणि कोरिअन संस्कृतीबाबतही तरुणाईला प्रचंड आकर्षण वाटत आहे. भारतातही आता अनेक कोरिअन खाद्यपदार्थ मिळतात. त्यापैकी एक अनेकांना आवडणारा पदार्थ म्हणजे रॅमेन ( ramen) म्हणजेच कोरिअन इंस्टंट न्युडल्स. आजकाल बाजारात कोरियन न्युडल्स सहज उपलब्ध होत आहे पण या इन्स्टंट नूडल्सबाबत एका व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, रॅमेन पॅकेजवर एक धक्कादायक चेतावणी लेबल दिसत आहे ज्यावर लिहिले आहे: “कर्करोग आणि पुनरुत्पादक हानी(Cancer and Reproductive Harm).” या चेतावणीची अर्थ असा होतो की, या रॅमेन न्युडल्समध्ये असे घडक आहे ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो किंवा प्रजनन क्षमता, गर्भाचा विकास किंवा एकूण पुनरुत्पादक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
कोरियन न्युडल्समुळे कर्करोग होऊ शकतो?
‘ओमगॉटवर्म्स’ नावाच्या एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने अनेक पॅकेट्स उलटून लेबल दाखवणारा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता त्याची चौकशी सुरू आहे. मागच्या बाजूला बारीक मजकुरात छापलेल्या या इशारा पाहून अनेकांना धक्का बसला.
व्हिडीओमध्ये दिसते की, रॅमनेनच्या विविध ब्रँडच्या पॅकेज दिसत आहे. तो न्युडल्सचे पॅकच्या मागील बाजूला इशारा दर्शवणारे लेबल दाखवत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”थांबा… रामेन नूडल्स ही चेतावणी घेऊन येतात? कर्करोग + पुनरुत्पादक हानी?? लेबल्स काळजीपूर्वक वाचा,” असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले.
Viral Video पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता
या व्हिडिओमुळे ऑनलाइन प्रतिक्रियांचा भडिमार सुरू झाला. अनेकांना हे पाहून धक्का बसला तर काहींनी सांगितले की,”त्यांना काही काळापासून या धोक्यांबद्दल माहिती होती. एका वापरकर्त्याने ही चेतावणी दिशाभूल करणारी असल्याचे सांगत ती फेटाळून लावली, तो म्हणाला, “ही माहिती खोटी आहे. मी माझ्याजवळ असलेले बुलडाक रॅमेन पॅकेट्स तपासले, अशी कोणतीही त्यावर चेतावणी नव्हती.”
कॅलिफोर्नियाच्या प्रस्ताव ६५ चा संदर्भ देत इतरांनी अधिक स्पष्टीकरण दिले. “मजेदार गोष्ट म्हणजे, माझ्या रेंचमध्येही तीच चेतावणी होती. कारण ते कॅलिफोर्नियामध्ये त्यांच्या उत्पादनांची पुनरुत्पादक हानी किंवा कर्करोगाच्या नुकसानाची चाचणी करण्यासाठी पैसे वाया घालवू इच्छित नाहीत, म्हणून ते फक्त ते लेबल लावतात,”
कॅलिफोर्नियाच्या प्रस्ताव ६५ चा(California’s Proposition 65) नुसार विशिष्ट रसायने असलेल्या उत्पादनांवर चेतावणी देणे आवश्यक आहे, अगदी थोड्या प्रमाणात असले तरीही.
व्हायरल व्हिडीओ
काही वापरकर्त्यांना अजिबात आश्चर्य वाटले नाही. “हे पहिल्या दिवसापासूनच दिसतं आहे. लोक पौष्टिक तथ्ये फारशी वाचत नाहीत. तुम्ही त्यांच्याकडून लहान अक्षरे वाचण्याची अपेक्षा करता का?!” एका व्यक्तीने कमेंट केली. दुसऱ्याने पुढे म्हटले, “कॅलिफोर्निया हा इशारा अक्षरशः प्रत्येक गोष्टीवर दिसतो.”
इतरांनी असे निदर्शनास आणून दिले की,”कधीकधी अन्नच नाही तर पॅकेजिंग ही समस्या असते. “बऱ्याचदा, पॅकेजिंग स्वतःच विषारी असते. उष्णता वापरून छापलेले रॅपर्स तुमच्या त्वचेत किमान निश्चित केलेल्या सुरक्षित एक्सपोजर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात रसायने सोडतात,” असे एका वापरकर्त्याने लिहिले.
युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरने नोंदवले आहे की ८१ ग्रॅम रॅमेनमध्ये एकूण १४ ग्रॅम फॅट्स आणि सुमारे ६.५ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असते – जे शिफारस केलेल्या दैनंदिन सेवनाच्या सुमारे एक तृतीयांश आहे.