Shocking Video Of Species In The Sea : समुद्राची दुनिया खूप सुंदर आणि वेगळी असते. परंतु, समुद्रात काही खतरनाक जीवही आढळतात. मगर, डॉल्फिन आणि पेंग्विनसारख्या प्राण्यांबाबत सर्वांनाच माहित असेल. पण खोल समुद्राच्या पाण्यात अनेक असे जीव राहतात, जे खूप विचित्र आणि भयानक असतात आणि लोकांना या जीवांबद्दल माहित नसतं. अशाच प्रकारचा एक जीव समुद्रात आढळला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा समुद्री जीव अजगरासारखा दिसतो. पण हा अजगराहून खतरनाक असल्यासारखं व्हिडीओत दिसत आहे. समुद्री जीवाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

हेलिकोसाल्पाचा व्हिडीओ व्हायरल

ट्वीटरवर हा व्हिडीओ @Massimo नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, समुद्राच्या पाण्यात चमकणारा जीव वेगळ्या प्रकारे हालचाल करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या अजब प्राण्याला पाहून असं वाटतं की, त्याच्या शरीरात धूर साचला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, जीनस हेलिकोसाल्पाजवळ असणाऱ्या प्रजाती केगच्या आकाराप्रमाणे साखळीत बांधल्यासारखी आणि पेलजिक ट्यूनिकेट्सप्रमाणे दिसत आहेत. ते सर्वात कमी आढळणाऱ्या सॅल्पसारख्या असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्वीटरवर हा व्हिडीओ पाहून यूजर्स झाले थक्क

ट्वीटरवर लोकांनी या जीवाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्यामुळं ८१ हजारांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलंय, त्यांना पाहण्यासाठी सर्वात चांगलं ठिकाण कोणतं आहे? तर दुसऱ्या यूजरने म्हटलं, ‘रहस्यमय हेलिकोसाल्पा’. सर्वात दुर्मिळ सॅल्प्स! जेव्हा मी कॉकपीटने त्यांना खाली पाहतो, तेव्हा मला असं वाटतं, जसं मी जगाच्या टॉपवर आहे. आपण किती वेगळ्या आणि अद्भुत जगात राहतो. तर अन्य एक यूजर म्हणला, निसर्ग किती सुंदर आहे.