सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपलं मनोरंजन करतात तर काही फोटोंवरून नजर हटत नाही. अशाच एका सुंदर दुर्मीळ प्राण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो एका पांढऱ्या हरणाचा आहे. तुम्ही या दुर्मिळ प्रजातीबद्दल ऐकले असेल पण क्वचितच पाहिले असेल. कारण ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ आहे.
IFS अधिकारी आकाश दीप बधवान यांनी ट्विटरवर या सुंदर दुर्मिळ पांढऱ्या हरणाचा फोटो शेअर केला आहे. जर तुम्ही प्राणी प्रेमी असाल तर या पांढऱ्या हरणाच्या नक्कीच प्रेमात पडाल. हे पांढरं हरण यूपीच्या कटारनियाघाट वन्यजीव अभयारण्यात दिसलं असून शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या हरणासोबत त्याची आईसुद्धा दिसत आहे. या फोटोनं नेटकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधलं आहे. या हरणाचा रंग पांढरा आहे मात्र त्याच्या आईचा रंग काळसर तांबूस पाहायला मिळतोय.
पांढऱ्या हरणाचा फोटो येथे पहा
हेही वाचा – आनंद महिंद्रा म्हणतात, तुमच्यामधूनही संगीत वाहुद्या…पाहा video
नेटीझन्सची प्रतिक्रिया
या फोटोनं सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे. हा फोटो आतापर्यंत 60 हजार लोकांपर्यंत पोहचला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या फोटोवर कमेंट्सद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहले आहे की, हे अतिशय अद्भुत दृश्य आहे. याशिवाय अनेक कमेंट्सद्वारे हरणाच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे. सध्या जगभर दुर्मिळ पांढऱ्या हरणाचे जतन करण्याचे काम सुरू आहे. कारण येत्या काळात ते नामशेष होऊ शकते.