आजच्या काळात आपण फारसे रस्ते लक्षात ठेवत नाही. कुठेही जायचे झाले की, जीपीएसचा वापर करून हव्या त्या ठिकाणी पोहचतो. पण बऱ्याचदा पूर्णपणे जीपीसी अवलंबून राहणे तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला जायचे एका ठिकाणी असते पण तुम्ही पोहचा मात्र भलत्याच ठिकाणी. तुमच्यासह देखील असा किस्सा घडला असेल. असाच काहीसा प्रकार थायलंडमधील एका महिलेसह घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला जीपीएसच्या मदतीने प्रवास करत होती. जीपीएस वापरून प्रवास करणाऱ्या माहिलेची कार चक्क लाकडी झुलत्या पुलावर जाऊन अडकली.

जीपीएस वापरणे महिलेला पडले महागात

त्याचं झालं असं की, त्या महिलेला जिथे जायचे होते, तिथे वाटेत एक लाकडी पूल होता जो पादचाऱ्यांसाठी होता. पण, महान जीपीएसने या महिलेला लाकडी पुलावर घेऊन गेले. हा पूल १२० मीटर लांब होता. महिलेची कार पुलावरून १५ मीटर पुढे गेली होती. त्यानंतर कारचे एक चाक पुलाच्या फटीमध्ये अडकले. महिलेला ना पुढे जात येत होते ना मागे जाता येत होते.

नदीच्या मधोमध झुलत्या पुलाच्या अडकली महिलेची कार

पुलाचे जास्त नुकसान होऊ नये आणि गाडी आरामात बाहेर काढता येईल यासाठी तातडीने बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. या काळात महिलेला काहीही झाले नाही. ती पूर्णपणे सुरक्षित आहे. महिलेने सांगितले की,”ती तिच्या मित्राला भेटायला जात होती. तिथे जाण्याचा रस्ता माहीत नसल्याने त्याने जीपीएसची मदत घेतली. जीपीएस त्याला पूल ओलांडण्यास सांगत होता,”त्यामुळेच तिने गाडी पुलावर वळवली. हा पूल केवळ पादचाऱ्यांसाठी आहे हे तिला माहीत नव्हते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला पुढे म्हणाली,”मी जीपीएसवर लक्ष केंद्रित करत होते आणि इकडे तिकडे पाहत नव्हते.” मला वाटले की,”पूल मजबूत आहे. पण जेव्हा मी अडकले तेव्हा मला भीती वाटली. मी नदीच्या मध्यभागी होते. गाडी नदीत पडेल असे वाटत होते. म्हणून मी गाडीतून बाहेर आले आणि मदत मागितली.”