सध्या सोशल मीडियावर नोएडातील एका सोसायटीमधील पुरुष आणि महिलेच्या भांडणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक महिला पुरुषाला शिवीगाळ करत, त्याचे केस ओढताना दिसत आहे. शिवाय यावेळी ती कुत्रा हरवल्याचे पोस्टर का काढले असा जाब त्या व्यक्तीला विचारत आहे. तर स्थानिक पोलिसांनी या घटनेशी संबंधित माहिती ट्विटरवर शेअर करताना सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली असून नोएडा सेक्टर-११३ मधील पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एम्स गोल्फ अव्हेन्यू सोसायटीमधील असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

एम्स गोल्फ अव्हेन्यू सोसायटीत एक कुत्रा हरवला होता, त्यामुळे तो बेपत्ता झाल्याचे एक पोस्टर सोसायटीत लावण्यात आले होते. ते पोस्टर एका व्यक्तीने काढले. याच मुद्द्यावरून कुत्र्याची मालकीण आणि पोस्टर फाटणाऱ्या व्यक्तीमध्ये जोरदार भांडण झाले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिलेने पुरुषाची कॉलर पकडून ठेवल्याचे दिसत आहे. तसेच यावेळी ती या पुरुषाचे केस ओढत त्याला मारहाण करताना दिसत आहे.

हेही पाहा- प्रसिद्धीसाठी काहीपण! महिलेने प्रेग्नन्सी फोटोशूटसाठी ठेवली ‘अंत्यसंस्कार’ थीम, विचित्र फोटो पाहून डोकंच धराल

व्हायरल व्हिडिओमधील महिला समोरच्या व्यक्तीला म्हणते, “अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन (AOA) सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे आहे का? मी कॉलर सोडणार नाही. तुम्ही चुकीचं आणि असभ्य का बोलला? नम्रपणे बोला. पोलिसांना बोलवा.” यावर तो व्यक्ती म्हणतो, “तुम्ही जा आणि एओएशी बोला, माझी कॉलर सोडा. मी काहीही चुकीचे बोललो नाही आणि तुम्हीही नम्रपणे बोला, नाहीतर अडचणीत याल. कुत्र्याचे पोस्टर काढले तर तुम्हाला काय अडचण येत आहे? तुम्ही कोणाशीही गैरवर्तन करणार का, तुम्हाला येथील नियमांचे पालन करावे लागेल.” या व्यक्तीचे बोलणं ऐकताच महिला संतापते आणि त्याला जोरदार मारहाण करायला सुरुवात करतना व्हिडीओत दिसत आहे.

पोलीस म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घटना कधी घडली याची पुष्टी झालेली नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ २३ सप्टेंबरपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोएडा पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे. तसेच या घटनेबाबतची तक्रार नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु केला आहे.