सध्या सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून हसून तुमचे पोट दुखायला लागेल. वास्तविक, व्हायरल क्लिपमध्ये, एक रिपोर्टर गावातील शिक्षिकेला जानेवारीचे स्पेलिंग विचारतो. सुरुवातीला मॅडम खूप संकोचतात. त्यानंतर पत्रकाराची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करतात. पण हा रिपोर्टर शिक्षकेला पुन्हा प्रश्न विचारतो. यानंतर मॅडम जे उत्तर देतात ते ऐकून तुम्हाला कदाचित हसू आवरता येणार नाही. तर तुम्हीही हा व्हिडीओ पाहा..

ग्रामीण भागातील सरकारी शाळांमधील शिक्षक मुलांचे भवितव्य घडवण्याची जबाबदारी कशी पार पाडतात, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका शिक्षकाचा व्हिडीओ समोर आला आहे, जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तुमचा सरकारी शाळांवरील विश्वास उडू शकतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक रिपोर्टर एका गावातल्या सरकारी शाळेत रिपोर्टिंग करत आहे. जिथे त्याला शाळेच्या एका मॅडम भेटतात. यानंतर रिपोर्टर मॅडमला जानेवारीचे स्पेलिंग विचारतो. पहिल्यांदा मॅडम एक प्रकारे स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर म्हणतात ही मुले सांगतील त्यांना विचारा. पण रिपोर्टर मॅडमच्या मागे पडतात. यानंतर मॅडम जेव्हा january चे स्पेलिंग सांगतात तेव्हा ते ऐकून थक्क होतात.

( हे ही वाचा: नोएडाचा ट्विन टॉवर कोसळताच ट्विटरवर झाला मीम्सचा वर्षाव; वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओमध्ये पहा शिक्षिका मॅडमचे ज्ञान

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर the.innocent.br0 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, शिक्षकांचे उत्तर नक्कीच ऐका. व्हिडीओला आतापर्यंत १२ हजारांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. त्याच वेळी, क्लिप पाहिल्यानंतर, प्रत्येकजण मजेदार कमेंट करत आहे.