सर्व वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञान असूनही समुद्राखालील जगाबद्दल आपल्याला अजूनही फारच कमी माहिती आहे. अजूनही असे अनेक सागरी जीव आहेत जे मानवासाठी आश्चर्यापेक्षा कमी नाहीत. असाच एक विचित्र मासा नुकताच दिसला ज्याला कपाळावर हिरव्या रंगाच्या बल्बसारखे डोळे आणि त्वचा अगदी काचेसारखी पारदर्शक आहे. हा एलियनसारखा मासा पाहून वैज्ञानिक सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. काही लोक याला ‘एलियन’ म्हणत आहेत. पण हे देखील खरे आहे की कोणीही एलियन पाहिलेला नाही. असा विचित्र मासा पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचिक व्हाल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, असा मासा आजपर्यंत कधीच दिसला नव्हता, ज्याचा पुढचा भाग पूर्णपणे पारदर्शक आहे.

कॅलिफोर्नियातील मॉन्टेरी खाडीच्या खोलगट भागात शास्त्रज्ञांना हा विचित्र मासा सापडला आहे. या विचित्र माश्याला ‘बॅरेली फिश’ असं म्हणतात. त्याला ‘स्पूक फिश’ असंही म्हटलं जातं. समुद्राच्या खोलीत राहणाऱ्या या माशाच्या कपाळावरच हिरव्या रंगाचे डोळे असतात. मांजरीचे डोळे जसे अंधारात चमकतात अगदी त्याप्रमाणेच या माश्याचे हिरवे डोळे सुद्धा अंधारात चमकतात. त्याचे हे हिरवे डोळे डोळा कपाळातून बाहेर दिसतात. मॉन्टेरी बे एक्वैरियम रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांना हा विचित्र सापडला आहे, जे याआधी सुद्धा नऊ वेळा पाहिला गेलाय.

या दुर्मिळ आणि विचित्र माश्याचा एक व्हिडीओ मॉन्टेरी बे एक्वेरियम संशोधन संस्थेने शेअर केला आहे. रिपोर्ट्सनुसार या माशाचा व्हिडीओ बनवण्यासाठी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या टीमला ५ हजाराहून अधिक वेळा समुद्राखाली डुबकी मारावी लागली. ‘Barreleye Fish’ हा अत्यंत दुर्मिळ मासा असून त्याचे वैज्ञानिक नाव ‘मॅक्रोपिना मायक्रोस्टोमा’ आहे. ९ डिसेंबर २०२१ रोजी शास्त्रज्ञांना तो शेवटचा दिसला होता. MBARI च्या रिमोटने चालणाऱ्या वाहनाने मॉन्टेरीच्या उपसागरात डुबकी मारली तेव्हा हा मासा पहिल्यांदाच शास्त्रज्ञांना दिसला. इतका सुंदर मासा त्यांनी याआधी पाहिला नव्हता.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या ड्रामेबाज सापापुढे बडे बडे अभिनेते सुद्धा फिके पडतील, हात लावताच करतोय मेल्याचं ‘नाटक’

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कर्करोगाशी लढा देणाऱ्या ७७ वर्षीय आजोबांचा आईस स्केटिंग डान्सचा VIDEO VIRAL, पाहून तुम्ही व्हाल भावूक

समुद्राच्या २१३२ फूट खोलीवर हा अनोखा मासा सापडला होता. मॉन्टेरी बे अ‍ॅक्वेरियम रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ थॉमल नोल्स यांनी सांगितले की, सुरुवातीला ‘बॅरेली मासा’ त्यांना लहान वाटला, तेव्हाच त्यांना समजले की हा जगातील काही दुर्मिळ प्राण्यांपैकी एक आहे. या माशाच्या डोळ्यांवर द्रवपदार्थाने भरलेले आवरण होते, जे त्यांचे संरक्षण करतं. त्याचे डोळे शरीरातील सर्वात संवेदनशील क्षेत्र आहेत.

आणखी वाचा : कॉपी करण्याच्या नादात थेट चिखलाच्या डबक्यात कोसळली मुलगी..; VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश पाहून हा मासा पळून जातो
बॅरेली माशाचे डोळे पारदर्शक तसंच अतिशय संवेदनशील असतात. डोळ्यांवर प्रकाश पडताच या माशांना त्रास होऊ लागतो. त्यांच्या डोळ्यांसमोर कॅप्सूलसारखी रचना असते, जी नाक म्हणून काम करते. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे मासे शिकार करत नाहीत, पण पोहताना त्यांच्या तोंडासमोर एखादा छोटा मासा किंवा जेलीफिश आल्यावर ते गिळतात. असं मानलं जातं की हे मासे स्पंजसारख्या प्राण्यांचे अन्न हिसकावून खातात.