रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात, तरीही काही लोक जाणीवपूर्वक आपला जीव धोक्यात घालतात. असाच काहीसा एक बाईक चालवताना दिसत आहे ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या जगात तरुणाई लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात. यात रिल्स आणि सोशल मीडियाच्या नादात अनेकांचा बळी देखील गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र तरुणाईवर याचा काहीही फरक पडताना दिसत नाही.

स्टंटबाजी करतानाचे अनेक अपघातांचे व्हिडिओ याआधीही सोशल मीडियावर समोर आले आहेत. असे असूनही लोक सुधरण्याचे नाव घेत नाहीत. बाईक रेसिंग करताना तरुण मुले-मुलीही अपघाताचे बळी ठरले आहेत. अनेक वेळा रेसिंग करताना बाईकचा तोल बिघडला आहे. यामध्ये लोक स्वत:चाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालतात. असाच एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाईक रेसिंग करत असताना तोल गेला आणि मोठा अपघात झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही मुले रस्त्याच्या कडेला बाईक लावून हाताने काही हावभाव करताना दिसत आहेत. त्यानंतर, व्हिडिओमध्ये तीन लोक दुरून वेगाने दुचाकीवरून येताना दिसत आहेत. तिघेही वेगवेगळ्या दुचाकीवरून भरधाव वेगात येत असताना एकाचा तोल बिघडला आणि त्यावर स्वार असलेला तरुण खाली पडला. तो तरुण एवढ्या वेगात असतो की त्याचे शरीर रस्त्यावर गोल गोल फिरत ओढत पुढे जाते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: गुजरातमध्ये राहून झाली महाराष्ट्राची फौजदार! PSI पूजा कदम सांगतेय स्पर्धा परिक्षेतील यशाचं रहस्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर त्या व्यक्तीच्या बाईकला आग लागली जी खूप भीतीदायक आहे. व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की, ही व्यक्ती दुचाकीवरून रस्त्यावर पडताच त्याच्या मागे असलेल्या व्यक्तीचा तोलही बिघडतो. मात्र, तो कसा तरी त्याच्या दुचाकीवर ताबा मिळवून पुढे निघून जातो.