विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना सुरू होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. यापार्श्वभूमीवर देश-विदेशातून अहमदाबादेत क्रिकेट प्रेमींची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. भारताला केवळ तिसर्यांदा विश्वविजेते व्हायचे नाही तर २० वर्षांपूर्वी झालेल्या दारुण पराभवाचा बदलाही घ्यायचा आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करेल.
दोन्ही संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २० वर्षांनी आमनेसामने आले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी या विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केलीय. भारतीय संघ आतापर्यंत अजिंक्य राहिलाय. या अंतिम सामन्याचा थरार अवघ्या काही तासातच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
(हे ही वाचा : आनंद महिंद्रांनी शेअर केला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रंगणाऱ्या ‘एअर शो’च्या सरावाचा Video; म्हणाले, “माझे सहकारी…” )
१९ नोव्हेंबर रोजी होणार्या अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी, रोहित शर्मा अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत उपस्थित होता. कुठे, खेळपट्टी, प्लेइंग इलेव्हन, अटी आणि इतर अनेक मुद्द्यांवर पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. पण त्याच दरम्यान काहीतरी असं घडलं, त्यामुळे हिटमॅनने संताप व्यक्त केला. रोहित शर्माने पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देत असताना नाराजी व्यक्त केली.
येथे पाहा व्हिडिओ
पत्रकार परिषद सुरु असताना अचानक त्यावेळी कोणाचा तरी फोन वाजला. यावर हिटमॅन थोडासा संतापला आणि म्हणाला, “काय, फोन बंद कर यार”, असं म्हणत त्याने काहीसा संताप व्यक्त केला. आता याच घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र, त्यानंतर लगेचच तो खेळपट्टीच्या परिस्थितीबद्दल बोलू लागला. कर्णधार रोहित त्याच्या वेगळ्या शैलीसाठी चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कॉन्फरन्समधली त्यांची उत्तरे कधीकधी खूप मजेदार असतात.