रशिया आणि युक्रेनमध्ये तणावाचं वातावरण आहे. रशियाच्या निर्णयामुळे युद्धाचे ढग अजून गडद होताना दिसत आहेत. रशियाने आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनमधील दोन प्रांताना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. रशियाच्या या निर्णयामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. लुहान्स आणि डोनेस्क हे दोन प्रांत बंडखोरांच्या ताब्यात असून त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या करारावर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. रशियाने या दोन्ही प्रांतांमध्ये सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व युक्रेनमधील रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावादी भागांच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याबाबत विचार करण्यासाठी व्लादिमिर पुतीन यांनी सोमवारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पाचारण केलं होतं.

पुतीन यांनी जनतेला संबोधित करताना केलेल्या युक्रेन हा रशियाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे सागितलं तसंच पूर्व युक्रेन ही प्राचीन रशियन भूमी आहे असंही म्हटलं. रशियाची जनता आपल्या निर्णयाचं स्वागत करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “डॉनेत्स्क आणि लुहान्स्कमधील नागरिकांच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासंबंधीचा हा निर्णय फार पूर्वीच घेतला जाणं आवश्यक होता,” असंही यावेळी ते म्हणाले.एकीकडे रशिया आणि युक्रेनमधील परिस्थितीवरून जगभरात तणाव असताना दुसरीकडे सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु आहे. यामुळे अशा स्थितीत मीम्सचा धुमाकूळ पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ आहे.

रशिया-युक्रेन तणावादरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुतिन यांचं कार्टून कॅरेक्टर दाखवण्यात आले आहे. ते आपल्या हातात नानचाकू घेऊन हल्ला करणार अशा स्थितीत येतात. मात्र नंतर जे काही होतं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

रशिया आणि फ्रान्समधील बैठकीवर एका यूजरने हा मीम शेअर केला आहे. हा पाहून तुम्हालाही हसायला येईल.

वापरकर्त्याने एंडगेमच्या संवादाच्या रूपात रशिया-युक्रेनमधील परिस्थिती दर्शविली आहे. हा मीम शेअर करताना पुतिन यांनी लिहिले की, रशिया आणि नाटो यांच्यात युद्ध झाले तर कोणीही जिंकणार नाही, अशी धमकी पुतिन यांनी दिली.

आणखी एका युजर्सने या परिस्थितीचे चित्रण ‘चुप चुप के’ चित्रपटाच्या संवादाच्या रूपात केले आहे. यामध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला करणार असं सांगितलं आहे. तेव्हा अमेरिका कोणावर हल्ला करणार असं वारंवार विचारत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युक्रेनची स्थिती दाखवणारा मीम एका यूजरने शेअर केला आहे. या मीममध्ये मिस्टर बीन हे युक्रेनचे नागरिक म्हणून रशियन आक्रमणाची वाट पाहत जमिनीवर पडलेले दाखवले आहे.