Breast Milk Coffee: नवजात मुलांसाठी आईचे दूध खूप फायदेशीर असते हे डॉक्टरांचे सांगितलेले तुम्ही अनेकदा ऐकले असेल. आई आणि बाळासाठी सरकारकडून जनजागृतीसाठी जाहिरातीही चालवल्या जातात, ज्यात बाळाला जन्मानंतर ६ महिने फक्त आईचेच दूध पाजण्याची शिफारस केली जाते. पण तुम्ही कधी ऐकले आईच्या दुधापासून कॉफी तयार केले जाईल असे तुम्ही कधी ऐकले का? एक रशियन कॅफे ब्रेस्ट मिल्क कॉफीपासून बनवलेली कॉफी सर्व्ह करण्याचा विचार करत आहे आणि यामुळे रशियन सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियन शहरात पर्म (Perm, Russia) मध्ये कॉफी स्माईल नावाचे कॅफे आहे. या कॅफेची सध्या खूप चर्चा आहे. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, कॉफी स्माईल (Coffee Smile) लवकरच आईच्या दुधापासून बनवलेली कॉफी सर्व्ह करण्यास सुरुवात करेल. यामध्ये ब्रेस्ट मिल्क कॉफी (Breast Milk Coffee Russia)रशियापासून कॅपेचिनो आणि लाट्टे बनवले जाणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला कॅफेने या कॉफीची जाहिरात रस्त्यावर चिकटवण्यास सुरुवात केली, त्यानंतर वाद सुरू झाला. लोकांनी सोशल मीडियावर जाहिरातीचा फोटो शेअर करण्यास सुरुवात केली.

कॉफीमध्ये वापरले आईचे दूध!

कॉफी स्माईलचे मालक, मॅक्सिम कोबिलीव्ह यांनी प्रसिद्धीसाठी एक व्हिडिओ जाहीर केला ज्यात दावा केला आहे की, त्यांच्या कॅफेच्या कॉफीमध्ये आईचे दूध वापले जाईल. हे आईचे दूध फार्मसी ग्रेड बॅगमध्ये साठवले जाईल. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने सांगितले की, ती हेअरस्टाइलिस्ट आणि आई आहे. मूल झाल्यानंतर तिला फारसे काम करता येत नव्हते. मग त्यांनी आईच्या दुधातून अतिरिक्त पैसे कमवण्याचा विचार केला. तिने सांगितले की, ती तिच्या नवऱ्यासाठीही आईच्या दुधापासून कॉफी तयार करते.

ब्रेस्ट मिल्कपासून तयार केलेली कॉफी सर्व्ह करणार हा कॅफे? ( फोटो सौजन्य – odditycentral)

हेही वाचा – ऐकावं ते नवलं! बार्बीसारखं दिसण्यासाठी तरुणीने खर्च केले ८२ लाख रुपये, संपूर्ण शरीरावर केली शस्त्रक्रिया

इतकी आहे किंमत

मॅक्सिमने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आईच्या दुधात मिसळण्यापूर्वी त्याची चाचणी करण्याबाबतही सांगितले जेणेकरून ते कॉफीसाठी सुरक्षित आहे. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला आईच्या दुधात ४०-४५ डोस मिसळून पेय तयार केले जाईल. पुढे जाऊन १००० प्रॉडक्ट करण्याचे ध्येयठेवण्यात आले आहे. या कॉफीची किंमत ६५० रुपये ठेवण्यात आली आहे. तसे, ही किंमत जास्त नाही कारण बर्‍याच मोठ्या कॉफी शॉपमध्ये मँगो मिल्क कॉफी सुद्धा इतक्या रुपयात मिळते.

ब्रेस्ट मिल्कपासून तयार केलेली कॉफी सर्व्ह करणार हा कॅफे? ( फोटो सौजन्य – odditycentral)

हेही वाचा –लस्सीला बुरशी लागल्याचा व्हिडिओ व्हायरल! अमुलने ग्राहकांना दिले स्पष्टीकरण, म्हणाले, ”तो व्हिडिओ…

मॅक्सिमने पाठ फिरवली

जेव्हा या कॉफीबद्दल देशात बंडखोरी सुरू झाली आणि लोकांनी देशाच्या अन्न सुरक्षा प्राधिकरणाला हस्तक्षेप करण्यास सांगितले तेव्हा मॅक्सिमने पाठ फिरवली. तो म्हणाला की, मी असे कोणतेही उत्पादन तयार करत नाही आणि आपल्या कॅफेला बदनाम करण्यासाठी ही जाहिरात केल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian cafe breaks the internet with breast milk coffee snk
First published on: 28-05-2023 at 18:54 IST