रशियाने गुरुवारी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर आज शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. तर, रशियन सैन्याची युक्रेनची राजधानी किव्हकडे आगेकूच सुरू आहे.  आजही रशियाकडून राजधानी किव्ह आणि इतर मुख्य शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. अशाच एका हवाई हल्ल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनविरुद्ध रशियाचं आक्रमण वाढलं आहे. शनिवारी किव्हमधील एका उंच इमारतीवर एक क्षेपणास्त्र आदळले. ही मिसाईल इमारतीवर आदळल्याचा क्षण व्हिडीओमध्ये कॅप्चर केला गेलाय. ही मिसाईल आदळताच एक मोठा स्फोट झाला. यामुळे इमारतीचं मोठं नुकसान झालंय.

सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमध्ये 6A लोबोनोव्स्की अव्हेन्यूवरील अपार्टमेंटचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये अनेक मजल्यांचा इमारतीचा एक भाग पूर्णपणे नष्ट झाला आहे.

युक्रेनच्या अंतर्गत मंत्रालयाने नंतर सांगितले की, या हवाई हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हल्ल्यानंतर इमारतीतील रहिवाशांची सुटका करून त्यांना उपचार आणि आश्रयासाठी सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian missile hits high rise residential building in ukraines capital kyiv video viral hrc
First published on: 26-02-2022 at 16:01 IST