इंडियन प्रीमियर लीग २०२१ (IPL 2021) ची दुसरी एडिशन काल रविवारपासून सुरू झाली आहे. पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला. दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ आयपीएलची ही एडिशन सुरु होण्यापूर्वी मज्जा मस्ती करताना दिसले. शिखर धवनने रविवारी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला, जो खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडिओमध्ये धवन सहकारी सलामीवीर पृथ्वी शॉला विचारतो, ‘मणि, तू काय करत आहेस? यावर पृथ्वी शॉ उत्तर देतो, मी भाजी बनवत आहे. मग धवन म्हणतो की कोणतीही भाजी केली जाणार नाही, पोहे बनवले जातील.” यानंतर दोन्ही खेळाडू काही डान्स मूव्ह करताना दिसत आहेत. धवनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आज सब्जी नहीं पोहे बनेंगे.’

(हे ही वाचा: “जैवलिन थ्रो एक प्रेम कथा..” नीरज चोप्राची जाहिरात क्षेत्रात दमदार एन्ट्री)

मालिकेतील संवाद

वास्तविक हा संवाद हिंदी टीव्ही मालिका ‘साथ निभाना साथिया’ मधून घेण्यात आला आहे. या सिरीयलमध्ये कोकीलाबेन मोदी आपल्या मोलकरीण मणीवर रागावली जेव्हा ती पोहे बनवण्याऐवजी भाजी कापत होती, कारण कोकिलाबेनने तिला पोहे बनवायला सांगितले होते.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

पृथ्वी आणि धवनचा हा मजेदार व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहतेही खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘भाईसाहेब, तुम्ही कोणत्या लाइनमध्ये आला आहात?’ दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘घटस्फोटाचा खूप परिणाम झाला आहे.’

(हे ही वाचा:अविश्वसनीय! सापांनी भरलेल्या बंदिस्त ठिकाणी ‘तो’ आरामात बसतो; व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?)

धवनने अलीकडेच पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतला. मात्र, या संदर्भात शिखरकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. आयशाने सोशल मीडियावर अकाऊंटवरून एका भावनिक पोस्टमध्ये ही माहिती दिली होती. शिखरची आगामी टी -२० विश्वचषक संघात निवड झाली नाही. दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएलच्या दुसऱ्या एडिशनमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २२ सप्टेंबरपासून आपलं सामना सुरु करेल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sabji nahi pohe banenge shikhar dhawan orders prithvi shaw the hilarious video went viral meme ttg
First published on: 20-09-2021 at 09:48 IST