Sarvajanik Mandal pati viral: मुंबई, पुण्यातसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आणि एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. अशातच घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असून, बाप्पा थाटात विराजमान झाला आहे. बुद्धीची देवता, सर्वांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचे घराघरांत वाजत-गाजत स्वागत झाले आहे. गणेश चतुर्थीचा उत्साह फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातच असून सर्वच गणरायाच्या सेवेसाठी भक्त सज्ज झाले आहेत. सार्वजनिक मंडळांमध्येही बाप्पाचं आगमन झालं आहे. अनेकदा मंडळातील गणपती बाप्पाची मूर्ती आकर्षक असते, तसेच त्यांची सजावटही वेगळी आणि आकर्षित असते त्यामुळे भक्त मंडळाचे गणपती पाहण्यासाठी गर्दी करतात.
अशावेळी मंडळांडून वेगवेगळ्या सूचना मंडपाबाहेर लावलेल्या पाहायला मिळतात. अनेकदा या सूचना पाटीवर लिहून ही पाटी बाहेर लावली जाते. कधी शिस्तीसंदर्भात या सूचना असतात तर कधी नियम असतात. मात्र सध्या एका मंडळाने लावलेली अशी एक पाटी व्हायरल होत आहे.
गणपती बाप्पाच्या दर्शनाला नेहमीच भाविकांची गर्दी असते आणि त्यात गणेशोत्सवात तर येथे दर्शनाला तुफान गर्दी असते. बाप्पाचं साजरं रूप पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात. यावेळी भाविक तासन् तास रांगेत उभे राहून बाप्पाच्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत असतात. दरम्यान, काही असेही असतात की, जे ओळखीचा फायदा घेत, रांगेत उभं न राहता आतमध्ये जातात. अशा व्यक्तींमुळे जे तासन् तास रांगेत उभे असतात त्या भाविकांना दर्शनासाठी आणखी उशीर होतो.
अशाच भक्तांना पुणेरी शैलीत उत्तर दिलं आहे. गणपती मंदिराबाहेर एक पाटी लावली आहे. यावर “दर्शनाला रांगेतच जावे कारण…, वशिल्याच्या चोरवाटा मुर्तीपर्यंच नेतात…देवापर्यंत नाही…” असं लिहलं आहे. बऱ्याचदा ओळखीनं लोक थेट मूर्तीपर्यंत पोहोचतात. मात्र, अशा वेळी तुम्हाला मूर्ती तर दिसेल; पण चुकीच्या मार्गानं आल्यामुळे देव मात्र भेटणार नाही, असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाप्पाच्या सेवेसाठी असलेले कार्यकर्ते बऱ्याचदा आपल्या ओळखीच्या लोकांना थेट आतमध्ये प्रवेश देतात. यावेळी रांगेत असलेल्या लोकांना ताटकळत उभं राहावं लागतं.
पाहा पाटी
https://www.instagram.com/reel/DIfpeXMyJKA/?igsh=MXBuMTVtYTJydmY5Yg==
सोशल मीडियावर हा फोटो ashokugale2 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.