Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्सचे व्हिडीओ मजेशीर असतात तर काही डान्सचे व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शाळेतील एका कार्यक्रमात दोन चिमुकले जोडीने अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या लहानपणीचे दिवस आठवतील. (school students couple dance so gracefully on marathi song)

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला आणि एक चिमुकली स्टेजवर खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. ‘अशी ही बनवा बनवी’ या मराठी चित्रपटातील लोकप्रिय गीत ‘हृदयी वसंत फुलताना’ या गाण्यावर अतिशय अप्रतिम असा डान्स करत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही त्यांचे चाहते व्हाल. त्यांची ऊर्जा पाहून लोक टाळ्या वाजवताना दिसत आहे. रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कल येथील कार्यक्रमामधील व्हिडीओ आहे.

हेही वाचा : ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; महिलेची पर्स चोरी करुन पळत होता चोर, नंतर १४ सेंकदात घडलं असं की, VIDEO व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : जिंकलंस भावा! ‘आमी जे तोमार’ गाण्यावर तरुणाने सादर केलं अप्रतिम शास्त्रीय नृत्य, थेट कार्तिक आर्यनला टक्कर दिली टक्कर

mumbai2maharashtra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”कहर कहर नुसता कहर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे असं फक्त मराठी शाळेतच बघायला मिळते. गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी” तर एका युजरने लिहिलेय, “यांना नाही माहिती यांनी किती छान काम केले आहे. मोठे झाल्यावर कळेल यांना या गाण्याचं महत्त्व” आणखी एका युजरने लिहिलेय, “यांना आणि यांच्या डान्स शिक्षकांना सलाम”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक युजर लिहितो, “हे चिमुकले मोठे झाले असणार कारण हा व्हिडिओ जुना आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांना या चिमुकल्यांचा डान्स खूप आवडला आहे. यापूर्वीही अनेकदा सोशल मीडियावर शालेय विद्यार्थ्यांच्या असे डान्सचे व्हिडीओ समोर आले आहेत.