School Viral Video : लहान मुलांमध्येही हल्ली मोबाईलचे व्यसन वाढत आहे. काही मुलांना जेवताना किंवा अभ्यास करतानाही हातात मोबाईल हवा असतो. मोबाईलशिवाय त्यांचा दिवस जात नाही. लहान मुलांमधील मोबाईलचे हे व्यसन इतके वाढले आहे की, काही वेळा पालकांवर डॉक्टरांच्या सल्ल्याचा आधार घेण्याची वेळ येते. अशा मुलांसाठी काही शिक्षकांनी अशी एक युक्ती शोधून काढली आहे, जी पाहिल्यानंतर मुलं मोबाईलला पुन्हा हात लावताना १०० वेळा विचार करतील. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी शिक्षकांनी अवलंबलेल्या पद्धतीचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

मुलं घाबरूनच मोबाईलला लावणार नाहीत हात

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेच्या मैदानात मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले आहेत. इतक्यात एक शिक्षिका तिचा डोळा धरून मुलांजवळ पोहोचते. दुसरी शिक्षिका तिला पाहताच भीतीने ओरडू लागते आणि विचारते, “काय झालं मॅडम?” त्यावर डोळ्यावर पट्टी बांधून आलेली शिक्षिका खुर्चीत बसते आणि सांगते की, मी मोबाईलचा खूप वापर करीत होते. त्यामुळे माझी ही अवस्था झाली.

मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी शिक्षकांनी वापरली युक्ती (Mobile Addiction)

त्यानंतर एक शिक्षिका मुलांना सांगितले की, मॅमची काय अवस्था झाली आहे पाहा, त्यांच्या डोळ्यांतून किती रक्त येत आहे… त्यानंतर एक शिक्षिका मोबाईल घेऊन मुलांच्या दिशेने जाते आणि एकेकाला विचारते की तुला पाहिजे का मोबाईल? ज्यावर मुलं घाबरून मोबईल हातात घेण्यास नकार देतात. त्यानंतर सर्व शिक्षकांनी मुलांना विचारले की, कोणाला मोबाईल हवा आहे का? त्यावर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एकही विद्यार्थी मोबाईल हातात घेण्यासही तयार होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओच्या शेवटी एक शिक्षिका मुलांकडे गेली तेव्हा काही मुलं रडत होती. यावेळी एका मुलाला शिक्षिकेनं विचारलं, का रडत आहेस तू? आता पुन्हा मोबाईल वापरशील का बेटा? त्यावर मुलानं न बोलता, मान हलवत नाही, असं म्हटलं. मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी हा व्हिडीओ बनविण्यात आला आहे. शाळेतील शिक्षकांनी मुलांना नवीन पद्धतीनं शहाणपण शिकवण्यासाठी केलेल्या स्तुत्य प्रयत्नाचा हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बदाऊन येथील एचपी इंटरनॅशनल स्कूलचा असल्याचे सांगण्यात येत आहे.