Viral Video: लहानपणी अनेकदा आपण तहानलेल्या कावळ्याची गोष्ट ऐकली असेल. कावळ्याला तहान लागते आणि तो पाण्याच्या शोधात असतो, तर एका भांड्यात त्याला पाणी सापडते आणि त्याची पातळी कमी असते म्हणून तो त्याच्यात दगड टाकतो आणि पाण्याची पातळी वाढते आणि मग तो पाणी पिऊन आपली तहान भागवतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पहायला मिळाला आहे; ज्यात आपले अन्न मिळवण्यासाठी कावळा दगड टाकतो आणि ही गोष्ट खरोखर पूर्ण करून दाखवतो.

काही प्लास्टिकच्या पारदर्शक ट्यूब कावळ्यासमोर ठेवल्या आहेत. तसेच या ट्यूबमध्ये कावळ्यासाठी काही अन्नाचे दाणे टाकलेले असतात. या ट्यूब अगदीच लहान असल्यामुळे कावळ्याची चोच आतमध्ये जात नसते. म्हणून अगदीच पुस्तकातल्या गोष्टीप्रमाणे खाली पडलेले दगड उचलून कावळा त्या ट्यूबमध्ये एक-एक करून टाकत असतो आणि शेवटी पाण्याची पातळी वाढते आणि कावळा अन्नाचा दाणा खातो. गोष्टीप्रमाणे कृत्य करणाऱ्या कावळ्याचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

हेही वाचा…शेतातील डिझेल इंजिन सुरु करण्यासाठी शेतकऱ्याचा अनोखा जुगाड; सायकल अन् दोरीचा केला असा वापर; पाहा Video

व्हिडीओ नक्की बघा :

कावळ्याची हुशारी पाहून आठवेल लहानपणीची गोष्ट :

व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, टेस्ट ट्यूब अर्ध्या पाण्याने भरलेली असते. या पाण्यात कावळ्यासाठी काही अन्नाचे दाणे टाकलेले असतात. पण, अन्नाच्या दाण्यापर्यंत कावळ्याची चोच पोहचत नाही, त्यामुळे तो लहानपणीच्या गोष्टीप्रमाणे पाण्यात खडे टाकतो. एकामागून एक चोचीने तो पाण्यात अनेक खडे टाकतो, की ज्यामुळे पाण्याची पातळी वाढते आणि ट्यूबमधील अन्नाचा कण हळूहळू वर येतो आणि कावळा ते मजेत खाताना दिसतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट @viralhog या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेकांना लहानपणी सांगण्यात आलेली गोष्ट आठवली असेल. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी कावळ्याची हुशारी पाहून त्याचं कौतुक करत आहेत. तसेच कावळ्याला या पिढीच्या मुलांपेक्षा भौतिकशास्त्राची जाणीव आहे, अशी एका युजरने कमेंट केली आहे आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.