माणूस असो वा प्राणी प्रत्येकाला भूक ही लागतेच, त्यामुळे हे दोघेही दोन वेळच्या भाकरीसाठी रात्रंदिवस कष्ट करत असतात. मात्र, शहरांमध्ये फिरणारे भटके प्राणी त्यांच्या अन्नासाठी माणसांवर अवलंबून असतात. कधी लोकांनी टाकलेल्या उष्ट्या अन्न पदार्थांवर ते आपलं पोट भरतात. अनेकदा भटक्या गाई, कुत्रे अशा अनेक प्राण्यांना आपण कचऱ्याच्या ढीगाऱ्यांवर खाण्याचे पदार्थ शोधताना पाहत असतो.

पण अनेक भागातील माकडे मात्र, अन्न न मिळाल्यास लोकांकडून हिसकावून घेत असतात. शिवाय अनेक लोक असेही असतात, जे माणुसकी जिवंत ठेवतात आणि या मुक्या प्राण्यांना खायला देतात. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हो कारण या व्हिडीओमध्ये काही लोकांनी माकडाला भाकरीचं आमिष दाखवत त्याची चेष्टा केल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- कॅब ड्रायव्हर मागील सीटवर बसलेल्या महिलेसमोरच काढू लागला कपडे; Video व्हायरल होताच कंपनीकडून मोठी कारवाई

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एका इमारतीच्या टेरेसवर काही सामान आणि पांढरे कापड ठेवल्याचं दिसत आहे. या कपड्याजवळ भाकरी ठेवल्याचं दिसत आहे. शिवाय या भाकरीला दोरीने नकली साप बांधला आहे. भाकरीच्या शोधात आलेल्या माकडाला भाकरी दिसताच तो ती खाण्यासाठी उचलतो. पण भाकरी उचलताच त्याला नकली साप दिसतो, त्याला पाहून तो घाबरून उडी मारतो आणि भाकरी टाकून पळून जातो. काही वेळाने, नकली साप काही हालचाल करत नाही तेव्हा तो परत आल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हेही वाचा- धक्कादायक: शेजाऱ्याचा बदला घेण्यासाठी रागारागत मारल्या ११०० कोंबड्या; आता मारतोय कोर्टात चकरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajasthani_best_song नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ २८ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 68 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवाय माकडाची अशी चेष्टा करणाऱ्या व्यक्तीवर अनेकजण टीका करत आहेत. एकाने लिहिले की, कृपया असे कोणाशीही करू नका. दुसऱ्याने लिहिले की, जर तुम्हाला भाकरी देता येत नसेल तर अशी चेष्टा करू नका.