Viral video: आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर आता भारतवासी झाली तरी तिच्या बद्दलच्या बातम्या काही थांबलेल्या नाहीत. सचिन आणि सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीची आजही चवीने चर्चा होते. सध्या सीमा हैदर ही एखाद्या सेलिब्रिटीसारखी झालीये. सर्वत्र फक्त आणि फक्त सीमा हैदर हिच्याच नावाची जोरदार चर्चा आहे. सीमा हैदर ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. पाकिस्तानमधून सीमा हैदर ही ज्यावेळी भारतामध्ये दाखल झाली. त्यावेळीचे अनेक व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केले. इतकेच नाही तर सचिन याच्यासोबत धमाल करतानाचे देखील सीमा हैदर व्हिडीओ शेअर करते. नुकताच आता सीमा हैदर हिने त्यांच्या बेडरुममधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये सीमा हैदर प्रिंटेड वर्कच्या साडीत दिसत आहे, तर सचिनने पँट-शर्ट घातलेला आहे. दोघांनीही अप्रतिम डान्स परफॉर्मन्स दिला आहे, ज्याला पाहून चाहते खूप खुश दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सीमा आणि सचिन यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत आहे. सीमा हैदरची साडी आणि सचिनच्या साध्या पण स्मार्ट ड्रेसिंगने या व्हिडीओला आणखी खास बनवले आहे. सीमा हैदर आणि सचिनने ही ‘मैं निकला ओ गद्दी लेके मैं निकला ओ गद्दी लेके ओ रास्ते पर ओ सड़क मे, एक मोढ़ आया, मैं उत्थे दिल छोड़ आया’ या गाण्यावर डान्स करत आहे.

यापूर्वीही सीमा हैदर हिचे अनेक व्हिडीओ डान्सचे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सीमा हैदर हिला डान्स करण्यास प्रचंड आवडतो. सीमा हैदर हिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. सीमा हैदरने घरातच हा व्हिडिओ शूट केले आहे. सीमा आणि सचिन हे आता यूट्यूबवर स्वतःचा ब्लॉग देखील बनवत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “दिलात झापुक झूपूक वाजत राहतय गं” माय-लेकींनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीमा हैदर हिचा हा डान्सही काही लोकांना आवडल्याचे बघायला मिळतंय. लोक सीमा हैदर हिच्या या डान्सच्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. एकानं प्रतिक्रिया देत म्हंटले, “किती अप्रतिम नृत्य आहे,” तर काहींनी म्हटले, “सीमा आणि सचिनची जोडी हिट आहे.”