Nepal To Ayodhya Rally From Seeta Home: लाइटहाऊस जर्नलिझमला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केलेला व्हिडिओ आढळला. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, नेपाळमधील सीतेच्या माहेरातुन अयोध्येतील राम मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली आहे. सीतेच्या माहेराहून प्रभू श्री रामांसाठी भेटवस्तू व सामान घेऊन अयोध्येकडे भाविक निघाले आहेत असेही यामध्ये म्हणण्यात आले आहे. नेमकं या व्हिडिओचं सत्य काय हे पाहूया..

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर वापरकर्ता माधव खुराणा यांनी X वर व्हायरल दावा शेअर केला.

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Firing over a petty dispute at Antop Hill
ॲन्टॉप हिल येथे किरकोळ वादातून गोळीबार
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

इतर वापरकर्ते देखील त्याच दाव्यासह हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओ InVid टूलमध्ये अपलोड केला आणि त्यातून काही कीफ्रेम्स मिळाल्या. रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर, आम्हाला एक फेसबुक रील सापडली, ज्यामध्ये व्हिडिओ ग्रेटर नोएडाचा असल्याचे नमूद केले आहे.

आम्हाला एका बातमीत व्हिडिओचा स्क्रीनशॉट देखील सापडला. नवभारत टाइम्सच्या वृत्तात नमूद केले आहे की हा व्हिडिओ बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांनी ग्रेटर नोएडाला भेट दिल्याच्या कार्यक्रमातील आहे.

https://navbharattimes.indiatimes.com/photomazza/state-photogallery/bageshwar-dham-sarkar-dhirendra-shashtri-in-greater-noida-divya-darbar-from-today-know-detail/photoshow/101638495.cms

आम्हाला हा कार्यक्रम आणि सहा महिन्यांपूर्वी काढण्यात आलेल्या कलश यात्रेबद्दलचे वृत्त देखील मिळाले.

हा व्हिडिओ ९ जुलै २०२३ रोजी अपलोड करण्यात आला होता. २२ जानेवारी २०२४ रोजी अभिषेक समारंभाच्या निमित्ताने अयोध्येत आलेल्या मिरवणुका किंवा भेटवस्तूंबद्दलच्या बातम्याही आम्ही तपासल्या.

आम्हाला इंडिया टुडे वर एक व्हिडिओ रिपोर्ट आढळून आला, ज्यामध्ये नेपाळचे भारतातील राजदूत डॉ शंकर पासद शर्मा यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाबद्दल नेपाळी नागरिकांमधील आनंद उत्साहाविषयी माहिती दिली आहे.

जनकपूर, नेपाळ येथून सुमारे ५०० लोकांनी ३००० भेटवस्तू घेऊन अयोध्येला मोठी मिरवणूक काढली होती, असेही या बातमीत नमूद करण्यात आले आहे. यामध्ये दागिने, स्वयंपाकघरातील भांडी, कपडे आणि बरेच काही समाविष्ट होते. आम्हाला त्याच संदर्भात एक बातमी देखील आढळली.

https://www.timesnownews.com/india/ram-mandir-pran-pratishtha-sitas-hometown-in-nepal-sends-thousands-of-gift-baskets-to-ayodhya-article-106867301

अहवालात नमूद केले आहे: भक्तीच्या भावनेने, भगवान रामाच्या सुमारे ५०० भक्तांनी नेपाळमधील जनकपूर धाम राम जानकी मंदिरापासून अयोध्येपर्यंत प्रवास केला. विश्व हिंदू परिषदेने (VHP) जनकपूर ते अयोध्या अशा भर यात्रेचे आयोजन केले होते. त्यांच्या ताफ्यात श्री राम आणि माता जानकी यांच्यासाठी ३,००० पेक्षा जास्त अनोख्या भेटवस्तू होत्या, ज्यात पैसे, कपडे, फळे, मिठाई, सोने आणि चांदी यांचा समावेश होता.

निष्कर्ष: नेपाळ ते अयोध्या या मिरवणुकीचा दावा केलेला व्हायरल व्हिडिओ, प्रत्यक्षात ग्रेटर नोएडामध्ये काढलेल्या मिरवणुकीचा व्हिडिओ आहे.