वाढती महागाई आणि जागतिक अर्थव्यवस्था ढासळत असताना केवळ भारतातच नाही तर जगभरात बेरोजगारी प्रचंड वाढतेय. आपल्या देशात बेरोजगारीची समस्या इतकी वाढली आहे की, सुशिक्षित तरुण कोणतेही काम करायला तयार होत आहे, मग ते काम काहीही असो, त्यातून पैसे कसे कमवता येईल हे पाहिले जाते. अशा परिस्थितीत जर एखाद्याला दोन कोटी पगार, राहण्यासाठी घर आणि पोटभर जेवण अशी जॉबची ऑफर दिली तर? अशी नोकरी मिळवण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करतील. अशाच जॉबची संधी आता खरोखरच एका देशात उपलब्ध झाली आहे. मात्र बहुतांश लोक ती करण्यास तयार नाहीत. त्यामुळे ही जॉब ऑफर आता चर्चेचा विषय ठरली आहे. ही जॉब ऑफर नेमकी काय आहे आणि लोक ती करण्यास का नकार देत आहेत, हे जाणून घेऊ.

घरकाम करण्यासाठी मिळणार दोन कोटींचे पॅकेज

या जॉबसाठी अशा काही अटी घातल्या आहेत, ज्यामुळे दोन कोटी पगार असूनही लोक तो करण्याआधी शंभर वेळा विचार करतील, साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, शांघायच्या एका महिलेला पर्सनल केअर टेकर हवी आहे, जी २४ तास तिच्यासोबत राहून तिची काळजी घेईल. या कामासाठी ती महिला महिन्याला १६ लाख रुपयांपेक्षा जास्त पगार देण्यास तयार आहे.

महिलेने अवघ्या काही सेकंदांत तयार केला रस्त्यावर पूल; तिची कला पाहून तुम्हीही म्हणाल, ‘व्वा क्या बात हैं!’

महिलेने या जॉबसाठी दिली जाहिरात

या जॉब पोस्टसाठी एक जाहिरात देण्यात आली आहे, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या जाहिरातीनुसार, संबंधित महिला तिची काळजी घेण्यासाठी पर्सनल केअर टेकरला प्रति महिना १६,४४,४३५.२५ लाख पगार म्हणजेच वर्षभरात १.९७ कोटी रुपये पगार दिला जाईल. पण या जॉबसाठी तिने काही अटी घातल्या आहेत. या अटींनुसार, या जॉबसाठी अर्ज करणाऱ्या केअर टेकरची उंची किमान १६५ सेमी आणि वजन ५५ किलोपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. याशिवाय ती इयत्ता १२ वी किंवा त्यावरील शिक्षण घेतलेली असावी. राहायला नीटनेटकी, स्वच्छ असावी, तिला उत्तम नृत्य करता आले पाहिजे आणि गाता यायला पाहिजे. एका हाऊसकीपिंग सर्व्हिसने दिलेली ही जाहिरात सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे ज्या महिलेला पर्सनल केअर टेकरची गरज आहे, तिच्याकडे आधीपासून २ आया रोज बारा बारा तास काम करीत आहेत आणि त्यांना समान पगार मिळत आहे. पण आता तिने पर्सनल केअर टेकरसाठी दिलेल्या जॉब ऑफरमध्ये तिला अशा प्रकारची व्यक्ती हवी आहे जिला अजिबात स्वाभिमान नसावा, म्हणजे मालकिणीने सांगितलेले कोणतेही काम ती करील. म्हणजे मालकिणीने जर तिला पायातील शूज काढून दुसरे घालायला लावले तरी तिने ते केले पाहिजे. याशिवाय मालकिणीने ज्यूस, फळ किंवा पाणी काही मागितले तरी ते लगेच द्यावे लागेल. याशिवाय नोकरीच्या शिष्टाचाराचा भाग म्हणून केअर टेकरला मालकिणीच्या घरी येण्यापूर्वी गेटवर थांबून कपडे बदलावे लागतील. या अशा अतरंगी नोकरीच्या ऑफरने आता अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वीही अशा विचित्र जॉब ऑफरसंबंधित घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.