scorecardresearch

Coronavirus : लस घेताना फोटो काढणाऱ्यांना मोदी सरकार देणार पाच हजार रुपये; जाणून घ्या अधिक माहिती

₹ ५००० रुपये जिंकण्याची संधी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे

Coronavirus : लस घेताना फोटो काढणाऱ्यांना मोदी सरकार देणार पाच हजार रुपये; जाणून घ्या अधिक माहिती

भारतामध्ये एक मे पासून १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी लस तुटवड्यामुळे काही ठिकाणी अद्याप १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. तरी ज्यांना लस मिळालीय त्यांनी सोशल नेटवर्किंगवर लस घेतानाचे फोटो पोस्ट केलेत. यामध्ये अगदी सर्वसमान्यांपासून सेलिब्रिटींचाही समावेश आहे. मात्र आता या फोटो काढण्याच्या ट्रेण्डचा वापर केंद्र सरकारने लसीकरण मोहीमेमध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घेण्यासाठी करण्याचं ठरवलं आहे. त्यासंदर्भातील एक मोठी घोषणा नुकतीच केंद्र सरकारने केलीय.

सरकारने सुरुवातीपासूनच लोकांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावं यासाठी मोहीम राबवली आहे. लसीकरणाचे फायदे, लसीकरणासंदर्भातील सर्व माहिती सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवून त्यांनीही तातडीने लस घ्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. याचबरोबर आता सरकारने एका नव्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आता लस घेताना फोटो काढणाऱ्या आणि तो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करणाऱ्यांना पाच हजार रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय घेतलाय.

भारत सरकारने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. माय जीओव्ही या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओला कॅप्शन देताना, “नुकतीच तुम्ही करोनाची लस घेतलीय? लाखो लोकांना लसीकरणासाठी प्रेरणा देण्याची संधी तुमच्याकडे आहे. एका मस्त टॅगलाइनसहीत तुम्ही लस घेतानाच स्वत:चा फोटो शेअर करा आणि पाच हजार रुपये जिंकण्याची संधी मिळवा,” असं म्हटलं आहे.

या पोस्ट सोबत केंद्र सरकारने https://bit.ly/3sFLakx या वेबसाईटची लिंकही शेअर केली आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत या लिंकवर भारतीयांना स्वत:चा लस घेतानाच फोटो अपलोड करता येणार नाही. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने या अंतर्गत फोटो शेअर करताना दिलेल्या कॅप्शनची झलकही दाखवली आहे. स्वत:चा लस घेतानाचा फोटो शेअर करत या व्यक्तीने, ‘जन जन ने ये ठाना है, कोरोना को हराना है। वैक्सीन जरूर लगाना है’, अशी कॅप्शन दिली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-05-2021 at 08:29 IST

संबंधित बातम्या