छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आज ६ जून रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करत आहेत. तर अनेक शिवभक्त काहीतरी वेगळे करून महाराजांना अभिवादन करण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न धुळ्यातील चित्रकार राजेश वैद्य यांनी केलाय. वैद्य यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग लाकडावर कोरीव काम करून साकारण्याचा प्रयत्न केलाय. गेल्या एक ते दीड महिन्यापासून राजेश वैद्य कोरीव काम करताहेत.

महाराजांची पेंटिंग न करता ३६ एमएम एमडीएफ लाकडी फ्रेम वर शिवराज्याभिषेकाचा प्रसंग साकारण्याचा निर्णय वैद्य यांनी घेतला. त्यांनी कोरीव पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संभाजी राजे तसेच मावळे साकारले आहेत. सध्या ते या चित्राला रंग देण्याचं काम करत आहेत. या चित्रात जिवंतपणा यावा, यासाठी ३डी इफेक्ट देण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय.

(हे ही वाचा: स्विगी डिलीव्हरी बॉयला पोलीस हवालदाराकडून मारहाण; Video Viral झाला अन्…)

(हे ही वाचा: तुमच्या ड्रीम जॉब शोधण्यासाठी मदत करेल हे Optical Illusion; ‘ही’ टेस्ट घ्या आणि उत्तर मिळवा)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवराज्याभिषेकाचे अनेक पेंटिंग आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, पेंटिंगच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवीन करण्याचा राजेश वैद्य यांनी प्रयत्न केला असून त्यांनी साकारलेली ही कलाकृती लक्ष वेधून घेतं आहे.