विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. असं असलं तरी ५०-५० सुत्रामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेचे तिढा सुटलेला नाही. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ‘सामना’मधील अग्रलेखांबरोबरच पत्रकार परिषदांमधून भाजपावर टीका करताना दिसत आहेत.
एकीकडे भाजपाकडून कोणीही औपचारिकरित्या प्रतिक्रिया देत नसताना संजय राऊत रोज टीकाच्या फैरी झाडताना दिसत आहेत. त्यामुळेच आता संजय राऊत हे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. राऊत यांचे कौतुक करणारे, त्यांच्यावर टीका करणारे अनेक विनोद सोशल नेटवर्किंवर व्हायरल झाले आहे. पाहुयात असेच काही व्हायरल विनोद…
राऊत येणे…
पु लं असते तर एखाद्या गोष्टीला ‘ऊत येणे’ याच्या ऐवजी ‘राऊत’ येणे, असा शब्दप्रचार रूढ केला असता की काय !
— अँड.ऋषिकेश कुलकर्णी (@RishikeshAdv) November 4, 2019
आयुष्य चांगले सुरू होते…
आयुष्य चांगले सुरू होते…..
कुठून तो #संजय_राऊत मधूनच आला pic.twitter.com/IMo8i5HzmL— Shamal(शामल) (@ShamalShingte) November 4, 2019
चाणक्य…
संजय राउतला चाणक्य म्हणणे म्हणजे चायनीजच्या गाडीवरच्या पोराला
*ब्रूस लि* म्हणल्या सारखेच आहे— #shree sai (@surendravakhari) November 2, 2019
असं सुरुय हे..?
देवेंद्र फडणवीस,उद्धव ठाकरे आणि ओन्ली संजय राऊत pic.twitter.com/YfNa5SzVNS
— Pratik Patil (@Liberal_India1) October 31, 2019
कपल गोल्स…
क्रेज याला म्हणत्यात याला..!#संजय_राऊत pic.twitter.com/MwjiEU0E2p
— Mr.Vishvas Landge (@vishvas_landge) November 4, 2019
एक राऊत…
सौ दाऊद तो एक संजय राऊत, you love him or hate him, but you can’t ignore him @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @ShivSena @NarvekarMilind_ @Saamanaonline @aadeshbandekar pic.twitter.com/5U1ZamqptT
— Prashant M Susare (@prashantsusare) November 1, 2019
जुना बदला
यकीन मानो संजय राउत शिवसेना से कोई पुराना बदला ले रहा है ।
जैसे सुरजेवाला, दिग्विजय सिंह कांग्रेस को खा गये,
वैसे ही संजय राउत शिवसेना को खा जाएगा।— रानी अग्रवाल (@Raniiagrwal) October 31, 2019
काही दिवसात
थोड्यास दिवसांनी फक्त आणि फक्त संजय राऊत यांच्या मुळे शिवसेनेवर उद्भवणारी परिस्थिती..!!! #सायको_संज्या #संज्या_मंद_सेना_बंद pic.twitter.com/4oJ5XcAq62
— Nandu Karmalkar (@KarmalkarNandu) November 3, 2019
असे योगदान
शिवसेनेच्या जडणघडणी मध्ये संजय राऊत @rautsanjay61 यांची कामगिरी
अशी : pic.twitter.com/Kkc7X99lbq
— Shubham Joshi (@Shubhamjo7) November 4, 2019
तुम नाजूक सी जिद्दी लडकी…
तुम नाजूक सी जिद्दी लडकी
मैं संजय राऊत सा अडियल प्रिये! pic.twitter.com/Iw9OVJkfu7— बोक्या (@Bokya_2019) November 4, 2019
खिडकी उघडली की पाऊस आणि बातम्या लावल्या की संजय राऊत
खिडकी उघडली की #पाऊस,
आणि
बातम्या लावल्या की #राऊतकटाळलो रे भावांनो!#संजय_राऊत #अवकाळीपाऊस #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
— Satish Dada Sutar (@SutarSp) November 3, 2019
छोटा भाई शॉक..
संजय भौ राऊत जिंदाबाद
pic.twitter.com/Kee1CiRJaR— Amit Patil (@Social_Bandaa) November 3, 2019
आयुष्यात संकट फडणवीस बनून येतील…
आयुष्यात संकट फडणवीस बनून येतील
पण तुम्ही संजय राऊत बनून उभे राहा
— Siddhesh Sawant@official (@siddhesh2891) November 3, 2019
एकच वाघ
वाघ एकला राजा..
बाकी खेळ माकडांचा
दुबईत जसा दाऊत तसा
मुंबईत संजय राऊत. pic.twitter.com/4hPbRvOJvK— ʏօɢɛsɦ saաaռt (@yogi_9696) October 30, 2019
योगदान
बाळासाहेब गेल्यानंतर #संजय_राऊत यांनी मागच्या 3 – 4 दिवसात शिवसेनेसाठी दिलेलं योगदान उद्धव ठाकरेंच्या 6 वर्षातील योगदानापेक्षा #काकणभर तरी जास्तच भरेल यात कोणत्याही शिवसैनिकाला तिळमात्र शंका नसेल !#संज्या_भौ_रौत_फॉर_सीएम
— Mane (@insane_vm) November 1, 2019
कोण कोणाचे काय
संजय राऊत ..शिवसेना का दिग्विजय सिंह है
आदित्य ठाकरे ..शिवसेना का राहुल गांधी हैं..
….जो बिना अनुभव के ही मुख्यमंत्री बनने की जिद पर अड़ा हैं..@ShivSena— punit trivedi (@puneettrivedi32) November 1, 2019
फॉग नाही राऊत चाललेत…
भक्त: *दुकानदार_देवेन्द्रजी,क्या_चल_रहा_हैं*? *फौग ना*!!!
दुकानदार देवेन्द्रजी: *फौग_तो_पुराना_हैं*, *संजय राऊत_का_जमाना_हैं* !!! pic.twitter.com/CCj5oduECG— स्वप्निल म्हात्रे (@SSwapnil99) November 3, 2019
दरम्यान, ‘नागपूर तरुण भारत’ या वृत्तपत्रातील अग्रलेखामधून राऊत यांच्यावर पहिल्यांदाच टीका करण्यात आली आहे. विक्रम-वेताळ या पुराण कथेचा आधार घेत राऊत यांचे नाव न घेतला त्यांचा ‘बेताल’ असा उल्लेख करण्यात आला आहे. राऊत हेच राज्यामध्ये महायुतीचे सरकार आणण्यात अडथळा निर्माण कर असून संजयच धृतराष्ट्र होणार असेल तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी चिंतन होणे आवश्यक असल्याची टीका या अग्रलेखामधून करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिवसेनेला कधीच माफ करणार नाही अशी टीका या अग्रलेखातून शिवसेनेच्या भूमिकेचा समाचार घेताना करण्यात आली आहे. या टीकेविषयी मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये “‘तरुण भारत नागपूर’ नावाचा असा कोणते वृत्तपत्र आहे हे मला ठाऊक नाही,” असे उत्तर देत राऊत यांनी या भाष्य करणे टाळले.