Viral Accident Video: आजकाल सोशल मीडियाच्या दुनियेत सकाळपासून रात्रीपर्यंत शेकडो पोस्ट्स व्हायरल होताना आपण पाहतो. एखाद्याची मजेशीर क्लिप, तर एखाद्याचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ. हे सर्वच काही सेकंदांत चर्चेचा विषय बनतात. असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या लोकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. दिसायला साधा प्रसंग, पण त्यात दडलेला धोका पाहून तुम्हालाही श्वास रोखून धरावा लागेल, कारण फक्त एका चुकीने घडलेलं हे दृश्य नेमकं पुढे काय झालं याचा थरार मनातून जाईनासा करतो. या व्हिडीओमध्ये घडलेला प्रकार पाहून तुम्हीही अवाक् व्हाल आणि पुढे आयुष्यात सावधान राहण्याचा नक्की धडा घ्याल.
व्हिडीओत नक्की दिसतं काय?
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दिसते की, एक तरुण पाण्याची बाटली घेऊन एका इमारतीच्या छतावर येतो. छताच्या कडेला असलेली भिंत फारच लहान होती. तो तिथे बसून आरामात पाणी पिण्याचा विचार करतो. मात्र, बसताना तो भिंतीचा अंदाज चुकवतो आणि अचानक त्याचा तोल जातो. क्षणभरात त्याचा तोल गेला आणि बघता बघता तो थेट खाली कोसळतो.
या प्रकारानंतर जवळ असलेले दोन जण धावत येतात. ते घाबरून खाली जातात, पण कॅमेऱ्यात पुढे काय झाले, त्याला किती दुखापत झाली, तो वाचला की नाही; हे काहीच स्पष्ट दिसत नाही. इथेच प्रेक्षकांचा श्वास रोखला जातो. नेमकं पुढे काय घडलं? हा तरुण सुरक्षित राहिला की एखादी मोठी दुर्घटना घडली? हा प्रश्न डोक्यात घर करून बसतो.
लोकांची प्रतिक्रिया
हा थरारक व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर @gharkekalesh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही तासांतच हजारो लोकांनी तो पाहिला आणि धडधडत्या हृदयाने प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने कमेंट केली, “भावाला फोन बघण्यात गुंग होता म्हणता येणार नाही, पण तरीही किती बेपर्वा होता हा!”, दुसरा लिहितो, “प्रत्येक छतावर किमान ग्रिल असायलाच हवी, नाहीतर अशी प्रकरणं थांबणार नाहीत.” तिसरा म्हणतो, “कॉमनसेन्सचं नाव तरी ऐकलंय का?” तर चौथा थेट प्रश्नच करतो, “हा मुलगा वाचला का नाही? जगला की गेला?”
धडा काय घ्यायचा?
हा व्हिडीओ एक गोष्ट पुन्हा अधोरेखित करतो, थोडीशी चूक कधी मोठ्या अपघातात बदलू शकते. कधीही छतावर, उंचावर किंवा धोकादायक ठिकाणी उभं राहताना सावध राहणं आवश्यक आहे. कारण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या काही सेकंदांच्या क्लिपमागे कुणाचंही आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.