Darbhanga Nag Panchami Incident: उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातल्या अलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या सरौतिया गावात नागपंचमीच्या दिवशी एक थरारक प्रसंग घडला. गावातील एका कुटुंबाच्या घरात अचानक नाग शिरला तासन् तास त्या घरातच ठाण मांडून राहिला. गावकऱ्यांच्या मते, ती नागीण असावी आणि ती साधीसुधी नसून, १५ दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या त्या नागाच्या मृत्यूच्या सूडाग्नीने पेटलेली ती नागीण गावात शिरली असावी. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
१५ दिवसांपूर्वीची नागाच्या मृत्यूची घटना
गावकऱ्यांनी सांगितलं की, सुमारे १५ दिवसांपूर्वी प्रवेश दीक्षित नावाच्या व्यक्तीच्या घरात एक नर नाग चुकून मारला होता. त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी त्याच घरात अचानक नागीण दिसल्याने सर्व जण घाबरले. लोककथांनुसार जर एखादा नाग मारला गेला, तर त्याची जोडीदार नागीण त्याचा सूड घेण्यासाठी परत येते, अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात सापांना पवित्र मानले जाते आणि या महिन्यात साप दिसणे म्हणजे विशेष संकेत मानले जातात. त्यामुळेच गावकऱ्यांच्या मनात अजूनच भीती निर्माण झाली.
रात्रभर घरातच नागिणीचा ठिय्या
गावकऱ्यांनी सांगितलं की, नागीण घरात शिरल्यानंतर ती तासन् तास फुत्कारत राहिली. तिचा आक्रामक अवतार पाहून, घरातील कुटुंब आणि आसपासचे शेजारी पूर्ण रात्र काळजीत होते. नागीण वारंवार फणा उगारून बसत होती, ज्यामुळे कोणीही धाडसाने त्या घराजवळ जाणे शक्यच नव्हते.
वन विभागाचा प्रवेश – कठीण सुटका मोहीम
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी वन विभागाला कळवले. लगेचच त्यांचे एक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, नागीण खूपच आक्रमक होती. ती फणा उगारून, वारंवार फुत्कारत असल्याने वन कर्मचाऱ्यांना तिला पकडण्यात प्रचंड अडचण येत होती. गावकऱ्यांसमोरच नागाची ही थरारक सुटका मोहीम तासभर सुरू राहिली.
VIDEO व्हायरल – लोक थक्क
या बचाव मोहिमेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यात नागीण सतत आपला फणा उभारून विरोध करताना दिसते. अखेर वन विभागाच्या पथकाला कसेबसे तिला जिवंत पकडण्यात यश आले आणि गावापासून दूर सुरक्षित ठिकाणी तिला सोडण्यात आले. त्यानंतरच गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सूड घेणारी नागीण ही केवळ लोककथा की खरी घटना?
गावकरी मात्र खात्रीने म्हणतात की, ही साधी योगायोगाची घटना नव्हती. १५ दिवसांपूर्वी ठार झालेल्या नागाचा सूड घेण्यासाठीच नागीण तेथे आली होती. यावर सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली आहे.
येथे पाहा व्हिडीओ
तुमच्या मते खरंच नाग-नागीण प्रतिशोध घेतात का? की ही फक्त मान्यता? यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा…
(टीप : या वृत्तातील सर्व माहिती सोशल मीडिया स्रोतांवर आधारित आहे. त्यातील कोणत्याही प्रकारच्या दाव्याची लोकसत्ता पुष्टी करीत नाही.)