Viral video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्यात सुख-दु:खाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येक वेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव! अशा दुर्घटना अनेकदा बघायला मिळतात. सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात.
उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरात मुसळधार पावसादरम्यान, टोन्स नदीत काही लोक वाहून गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या दुःखद घटनेत किमान १० कामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आहे.ऑनलाइन समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, १० कामगारांचा एक गट नदीच्या वाहत्या पाण्यात अडकलेल्या ट्रॅक्टरवर असल्याचे दिसून आले. ते मदतीसाठी याचना करत होते. दरम्यान, काही लोक नदीच्या काठावर उभे राहून अडकलेल्या कामगारांना कसे मदत करावी याचा विचार करत असल्याचे दिसून आले. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ट्रॅक्टर उलटला आणि त्यावर बसलेले लोक वाहून गेले आणि दिसेनासे झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल मृत्यू कसा जाळ्यात ओढतो.
पाहा व्हिडीओ
उत्तराखंडमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, घरे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे आणि मंगळवारी पहाटे एक पूल वाहून गेला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पूर आल्यामुळे अनेक लोक बेपत्ता झाले आहेत.आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन म्हणाले की, देहरादूनमधील सहस्त्रधारा आणि माल देवता तसेच मसूरी येथूनही नुकसान झाल्याचे वृत्त आहे. देहरादूनमध्ये दोन ते तीन लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे .तामसा नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने तपकेश्वर महादेव मंदिरही पाण्याखाली गेले. पाणी मंदिराच्या अंगणात शिरले आणि हनुमानाच्या मूर्तीपर्यंत पोहोचले, परंतु गर्भगृह सुरक्षित राहिले.