Shocking Video: अनेकदा लोकांचे लहान सहान गोष्टींवरून वाद होत असतात. असे वाद होणं काही नवीन गोष्ट उरलेली नाही; पण या वादाला किती भयंकर रूप द्यायचं हे प्रत्येकाच्याच हातात असतं. उगाच राईचा पर्वत करून फक्त भांडायचं म्हणून का जण भांडण उकरून काढतात आणि समोरच्याला नको नको त्या गोष्टी ऐकवतात.

एवढंच नाही तर कधी कधी भांडण इतक्या टोकाला जातं की, त्याचं रूपांतर मारहाणीत होतं. सध्या असाच एक भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एका अपंग माणसाला काही लोकांनी मारहाण केली.

बुधवारी मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील एक विचित्र व्हिडिओ व्हायरल जाला आहे, ज्यामध्ये एका अर्धनग्न अपंग पुरूषावर भल्यामोठ्या काठीने क्रूरपणे हल्ला करण्यात आल्याचं दिसून येतंय. FPJच्या वृत्तानुसार, हे प्रकरण जुझार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे आणि पीडित एक विकलांग दुकानदार असल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल व्हिडीओ (Disabled Man Beaten Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दुकानदार अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे आणि गावातील दोन स्थानिक पुरुष त्याच्यावर क्रूरपणे हल्ला करत आहेत. पीडित व्यक्ती ओरडताना आणि त्याला वाचवण्याची विनंती करताना देखील दिसून येतोय.

पीडित व्यक्ती परिसरात एक छोटेसे दुकान चालवते आणि शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. त्याची प्रकृती चांगली नसली तरी, तो सन्मानाने उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो. तथापि, काही स्थानिक लोकांनी अज्ञात वादातून त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @FreePressMP या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बिचाऱ्याला किती मारलं आहे या लोकांनी”, तर दुसऱ्याने “अरे, तो अपंग आहे त्याची तरी जाण ठेवा” अशी कमेंट केली.

दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये संताप आणि चिंता निर्माण झाली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि पोलिसांच्या हस्तक्षेपाची वाट पाहत आहे.

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे, त्यामुळे गावात अशा गुन्ह्यांपासून सुरक्षितता आणि संरक्षणाबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छोट्या-मोठ्या कारणांवरून एखाद्या स्थानिक व्यक्तीवर सार्वजनिकरित्या हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही. अशा घटना वारंवार घडत असल्याने परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता असते.