Girls Fight Video Viral: मुलांचे असो किंवा मुलींचे असो…. हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच मुलांमध्ये असो किंवा मुलींमध्ये वाद होत असतात आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये होत. त्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. माझ्या बॉयफ्रेंडसोबत रिल का बनवली म्हणत एका तरुणीनं दुसऱ्या तरुणीला बेदम मारहाण करत अक्षरश: हद्दच पार केली आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
उत्तर प्रदेशातील बरेली येथील गांधी उद्यानजवळ दोन मुली त्यांच्या प्रियकरांसमोर एकमेकांशी भांडत आणि शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही मुलींना भांडताना पाहून घटनास्थळी गर्दी जमली. व्हिडिओमध्ये दोन्ही मुली एकमेकांना शिवीगाळ करताना, केस ओढताना आणि लाथा मारताना दिसत आहेत. यावेळी हा हाय-व्होल्टेज ड्रामा पाहणाऱ्या मुलींभोवती मोठी गर्दी उभी असल्याचे दिसून येते.
दोन्ही मुलींमध्ये भांडण होण्याचे कारण म्हणजे त्या दोघांनाही त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत रील करायचे होते. यामुळे त्यांच्यात वाद झाला, थोड्याच वेळात वाद वाढला आणि त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही मुलींचे बॉयफ्रेंडही घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही केला पण त्या ऐकायला तयार नव्हत्या
पाहा व्हिडीओ
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.