Viral video: सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारा येतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल होण्याऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारात होता, पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही… याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून यतो. मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही आणि कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत; ज्यात व्हिडीओ बनविताना अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, डोंगरावर, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडीओ शूट करताना दिसतात; पण काही वेळा त्याचे त्यांना गंभीर परिणामही भोगावे लागतात. अशाच एका तरुणाला आपला जीव धोक्यात घालणं महागात पडेल.
चीनच्या सिचुआन प्रांतातील माउंट नामा वरती फोटो काढण्याच्या नादात एका गिर्यारोहकाने आपला जीव गमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिर्यारोहकाने फोटो काढण्यासाठी सुरक्षा दोरखंड सोडला होता. त्यानंतर त्याचा तोल गेला आणि शिखरावरुन खाली पडून गिर्यारोहकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो फक्त ३१ वर्षांचा होता. हाँग अशी त्याची ओळख पटली आहे. बचावपथकं घटनास्थळी दाखल झाली परंतु जेव्हा ते त्याच्यापर्यंत पोहोचले तोपर्यंत हाँगचा मृत्यू झाला होता. नंतर त्याचा मृतदेह जवळच्या गोंगा माउंटन टाउनमध्ये नेण्यात आला.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @dreamsNscience नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. प्रसिद्धीझोतात येण्यासाठी तरुणाई स्टंट करताना दिसून येते. दिवसेंदिवस निरनिराळे स्टंट करण्याची जणू क्रेझच झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करताना दिसून येतात. नेटकरीही हा व्हिडीओ पाहून संतापले आहेत. एकानं म्हटलंय, “जीव एवढा स्वस्त असतो का?” तर आणखी एक जण म्हणतोय, “काही क्षणांच्या आनंदासाठी असं नका करू.”