Shocking video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी आणि त्यावर विश्वास ठेवायला लावणारी एक घटना घडली आहे. एका जन्मदात्या आईनं नुकत्याच जन्मलेल्या एका बाळाला नाळही न कापलेल्या अवस्थेत अक्षरश: पाईपमध्ये टाकून दिलं. पण, बाळाचं नशीब बलवत्तर म्हणून की काय, बाळाच्या रडण्याचा ऐकण्याचा आवाज ऐकला आणि लोकांनी त्या इवल्याशा जीवाला जीवदान दिलं. सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात मुली प्रगती करताना दिसतात. घर तर सांभाळतातच पण मोठमोठ्या जबाबदाऱ्याही सहज पार पाडतात. पण भारत चंद्रावर पोहोचला असला तरी असे काही लोक आहेत जे विचारांनी अजूनही मागास आहेत. मुलं आणि मुली यांच्यात भेदभाव करतात. स्त्री भ्रूणाची किंवा जन्मानंतर त्यांची हत्या करतात. असाच काहीसा प्रकार या घटनेतून पाहायला मिळत आहे.

आपल्या चुकांवर पांघरूण घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आपल्या मनात घर करून राहतात, तर काही वेळा अशा घटना समोर येतात की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. आई आपल्या लेकरासाठी खूप काबाडकष्ट करत असते, पण तीच आई मुलाच्या जीवावर उठली तर काय?

एका जन्मदात्या आईनं नुकत्याच जन्मलेल्या एका बाळाला नाळही न कापलेल्या अवस्थेत अक्षरश: पाईपमध्ये टाकून दिलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका पाईलाईनमधून बाळाच्या रडण्याचा आज येत होता तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आहे. यावेळी बचाव पथकानं घटनास्थळी येत पाईप कापून बाळाला सूखरूप बाहेर काढलं. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by ? ? (@its_shailya_edit47)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ its_shailya_edit47 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “स्वत:च्या मजेसाठी जन्माला घालता का?” तर आणखी एकानं, “स्वत:च्या लेकरासोबत असं कसं करु शकतात हे लोक”