Shocking viral video: सोशल मीडियाच्या दुनियेत आज ‘रील्स’ हे नव्या पिढीचं वेड बनलं आहे. काही सेकंदांच्या व्हिडीओत प्रसिद्धी मिळविण्यासाठी तरुणाई जीव धोक्यात घालायलासुद्धा मागे-पुढे पाहत नाही. ‘लाइक्स’ आणि ‘फॉलोअर्स’च्या नादामुळे अनेकदा जबाबदारी, सुरक्षितता व वास्तवाचा विसर पडतो. अशाच एका रीलच्या नादात आता एक जोडपे आणि त्यांचे मित्र भीषण अपघातात सापडल्याची घटना समोर आली आहे.

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. रील बनवण्याच्या नादात एक जोडपे दुचाकीवर स्टंट करताना भीषण अपघातात सापडले. ‘लाइक्स’ आणि ‘फॉलोअर्स’च्या मागे जीव धोक्यात घालण्याची ही प्रवृत्ती आता चिंतेचा विषय ठरली आहे. मोबाईल कॅमेऱ्यात रोमांचक क्षण शूट करताना वास्तव आणि जबाबदारीचा अनेकदा विसर पडतो. या घटनेने पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित केला आहे – रीलसाठी आयुष्य किती स्वस्त झाले आहे?

हा व्हिडीओ एका हायवेवर शूट करण्यात आला असून, त्यात एक जोडपे दुचाकीवर धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. मुलगा बाईक चालवत असताना मागे बसलेली मुलगी त्याच्या खांद्याला घट्ट धरून बसलेली असते. व्हिडीओत तो बाईक वेगात चालवत असतानाच पुढचे चाक थोडे उचलून स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. पण, त्यामध्ये काही सेकंदांतच बाईकवरील ताबा सुटतो आणि दोघेही जोरात रस्त्यावर आदळतात. त्यामागे असलेल्या त्यांच्या मित्रांचा ग्रुप, जो हा स्टंट रेकॉर्ड करीत होता, तोही धडक टाळण्याच्या प्रयत्नात अपघातात सापडतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ इतका भयावह आहे की, पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो.

पाहा व्हिडिओ

व्हिडीओ कुठल्या ठिकाणी शूट झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अनेकांनी हे भारतातच घडल्याचे म्हटले आहे. रस्त्यावरील चिन्हे आणि वाहनांवरून हा अंदाज वर्तवला जात आहे. जखमींची प्रकृती कशी आहे याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. या व्हिडीओची सत्यता अद्याप निश्चित झालेली नसली तरी सोशल मीडियावर मात्र तो वेगाने पसरत आहे.

या घटनेवर नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “काही सेकंदांच्या रीलसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणं योग्य आहे का? “स्टंट चित्रपटगृहात आणि व्यावसायिकांनी केले पाहिजेत; रस्त्यावर नाही. एका चुकीची किंमत तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर चुकवावी लागते.” दुसऱ्याने म्हटले, “अशा अज्ञानी तरुणांच्या रीलमधून तेल काढायला काठी लागेल, तेव्हाच त्यांच्या पालकांना अभिमान वाटेल. देश कोणत्या दिशेनं चाललाय हे समजेनासं झालं आहे.” ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की, सोशल मीडियाच्या दिसण्याच्या हव्यासापायी केलेला एका क्षणी पत्करलेला धोका आयुष्यभराच्या पश्चात्तापाचे कारण बनू शकतो.