सध्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. दिवसाढवळ्या चोर घरात घुसून चोरी करू लागले आहेत. तसेच सोनसाखळी चोरांचीही दहशत अनेक वर्षांपासून वाढली आहे. अनेकदा हे चोरटे बाईक किंवा कारमधून येऊन सोन्याच्या मौल्यवान वस्तू किंवा पाकीट, पर्स हिसकावून नेतात.

रस्त्यानं पायी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावतात. सोशल मीडियावर अशा चोरीच्या घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन चोरट्याने हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं, जाणून घेऊ या..

चोरीची घटना व्हायरल

सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुमहालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध महिला गेटजवळ उभी राहून एका अनोळखी माणसाशी बोलताना दिसतेय. फोनवर बोलत बोलत तो माणूस गेटजवळ येतो आणि वृद्ध महिला गेट उघडते. तो वृद्ध महिलेला काहीतरी विचारतो आणि महिलाही त्याच्याशी संवाद साधत असते, असं या व्हिडीओतून दिसतंय. तो महिलेला बोलण्यात गुंतवतो, महिलेला काहीतरी दाखवून बाजूला बघायला सांगतो. तेवढ्यात महिला बाजूला बघते आणि चोर तिच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न करतो.

या झटापटीत महिला खाली पडते. काहीतरी गडबड आहे हे लक्षात येताच घरातून एक तरुण मुलगी धावत घराबाहेर येते आणि चोराला पाहताच त्याच्या मागे पळत सुटते. या व्हिडीओचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं असून ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @kayan_7 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल १.३ मिलियन इतके व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “या आजींना वाटतं की त्या ९० च्या दशकात जगत आहेत, पण आजकालच्या परिस्थितीत कोणावर विश्वास ठेवू नका, कोणाशी बोलू नका”; तर दुसऱ्याने “खरंतर आजींचीही यात चूक आहे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “त्या मुलीच्या हिमतीला सलाम.”