Shocking Video: शूरवीर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. पोलिस दिवस-रात्र, ऊन-पाऊस न पाहता आपलं काम चोख बजावत असतात. त्यांची ड्युटी २४ तासच असते, असं म्हणायला काही हरकत नाही.
सोशल मीडियावर पोलिसांचे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. परंतु, आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला पोलिसांचा अभिमान वाटल्याखेरीज राहणार नाही. या व्हिडीओमध्ये एका पोलिसाने एका व्यक्तीला स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवलं.
गेल्या काही वर्षांत आत्महत्यांचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसून येतंय. मानसिक तणावातून अनेक लोक आता आत्महत्येचा पर्याय निवडू लागले आहेत. काही लोकांना स्वत:चंच आयुष्य जड झाल्यासारखं वाटू लागलं आहे. आयुष्यात होणाऱ्या त्रासाला कंटाळून लोक टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला संपवतायत. अशात एका माणसाने रेल्वे स्थानकावरून उडी मारून आपला जीव देण्याचा प्रयत्न केला. नेमकं झालं काय, जाणून घेऊया…
व्हायरल व्हिडीओ (VIRAL VIDEO)
व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसेल. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की एका रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वरून एक तरुण उडी मारतो. तितक्यात भरधाव वेगात एक ट्रेन येत असते. तरुणाचा हा जिवघेना प्रकार बघून तिथे असलेला एक पोलिस ऑफिसर अजिबात वेळ ना दवडता प्लॅटफॉर्म वरून खाली उडी मारतो.
खाली उडी मारल्यावर तो त्या तरुणाला धक्का देऊन बाजूला करतो आणि त्याच क्षणी रेल्वे येते. पोलिसांच्या तत्परतेने तरुणाचा जीव वाचतो. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ जुना असल्याचं बोलल जातंय. तसंच हा व्हिडिओ मुंबईतील दादर रेल्वे स्थानकातला असल्याचं या कॅप्शन मधे म्हटल आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @thetimespatriot या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला “दादर स्टेशनवर पोलिस ऑफिसरने वाचवले एकाचे प्राण” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १ मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “अशा मूर्ख माणसांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात जातो.” तर दुसऱ्याने “तुमच्यासारखी लोक कमी आहेत मदत करणारी” अशी कमेंट केली.