Mumbai Local Shocking Video: गेल्या काही वर्षांत आत्महत्यांचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसून येतंय. मानसिक तणावातून अनेक लोक आता आत्महत्येचा पर्याय निवडू लागले आहेत. काही लोकांना स्वत:चंच आयुष्य जड झाल्यासारखं वाटू लागलं आहे. आयुष्यात होणाऱ्या त्रासाला कंटाळून लोक टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला संपवतायत. अशात आत्महत्येबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहून काळजाचा ठोकाच चुकतो.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक माणूस रेल्वे रुळावर झोपून स्वत:चं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतोय. नेमकं या घटनेत काय घडलंय, जाणून घेऊ या…

थेट रेल्वे रुळावरच झोपला (Suicide Video)

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, रेल्वे रुळावरून धावत असताना मोटरमॅन रेल्वेची गती कमी करतो. हळू हळू रुळावरून पुढे सरकताना मोटारमॅनला दिसतं की, रेल्वे रुळावर एक माणूस आत्महत्या करण्यासाठी झोपला आहे. हे लक्षात येताच मोटारमॅन रेल्वे थांबवतो आणि हॉर्न वाजवत त्याला तिथून उठण्याचा इशारा देतो. मोटारमॅनच्या सतर्कतेमुळे एका माणसाचा जीव वाचतो. दरम्यान, ही घटना मीरा रोड येथे घडल्याचं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं जातंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @marathwada_marathi_news या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “मुंबई मीरा रोड स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर जीव देण्याच्या प्रयत्नात रुळावर झोपलेल्या व्यक्तीला पश्चिम रेल्वेच्या मोटरमनने लोकल काही अंतरावर थांबवली. रेल्वे थांबताच ती व्यक्ती डब्याखाली जाऊन बसली. जी. आर. पी. ने तात्काळ हस्तक्षेप करत त्याला वाचवले.” तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल 166k व्हयुज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “कृपया करून असं करू नका” तर दुसऱ्याने “स्वत:च्या जीवाची जरातरी पर्वा करा” अशी कमेंट केली. तर एकाने “आयुष्य इतकं स्वस्त असतं का?” अशी कमेंट केली.