Restaurant Kitchen Reality Video: आजकाल अनेकांना घरापेक्षा बाहेरचं अन्न आवडीने खाण्याची सवय झाली आहे. हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत आणि नवनवीन डिश ट्राय करण्याचा अनेकांचा अट्टहास असतो. पण हे अन्न नेमकं कसं बनवलं जातं हे कोणालाच माहित नसतं.
सोशल मीडियावर अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा आपल्याला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात लोकांच्या जीवाशी हा सर्रास खेळ सुरू असल्याचं दिसून येतंय. एका रेस्टॉरंटमध्ये जेवण बनवताना एका कर्मचाऱ्याने हद्दच पार केली आहे, नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ (Man mixing garbage in food Video)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुमच्या पायाखालची जमिनच सरकेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस विकृत कृत्य करताना दिसतोय. हा सरासर लोकांच्या जीवाशी खेळ खेळतोय असं म्हटलं तरी चालेल. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका हॉटेलच्या किचनमध्ये एक कर्मचारी कचरा काढताना दिसतोय. त्याच ठिकाणी गॅसवर एका टोपात अन्न शिजत असतं. हा कर्मचारी जमिनीवरील सगळा कचरा सुपलीत घेऊन त्या गॅसवर शिजत असलेल्या अन्नाच्या टोपात टाकताना दिसत आहे. हे कृत्य तो एकदा नाही तर दोनदा करतोय. याचा त्याला काहीही पश्चाताप नसल्याचंही या व्हिडीओत दिसून येतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @fimybaby या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २.२ मिलियन जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “बाहेर खाणे सुरक्षित नाही.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आशा आहे की त्याला आता कामावरून काढून टाकले असेल”, तर दुसऱ्याने “म्हणूनच मी कधीच बाहेरच खात नाही.” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे” तर एकाने “यांच्यासारख्या लोकांमुळे हॉटेल्स बदनाम होतात” अशी कमेंट केली.