Shocking Video: नवरा-बायकोचं नातं जगावेगळं असतं. या नात्यात जितकं प्रेम असतं तितकीच काळजी, तितकंच सुखदेखील असतं. पण, आजकाल या नात्यात तितका गोडवा राहिलेला नाही. हल्ली लहान लहान गोष्टींवरून होणारे वाद मारहाणीपर्यंत पोहोचले आहेत. अशा नवरा-बायकोच्या वादाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
अनेकदा नवरा-बायकोची भांडणं, त्यांच्यात झालेले वाद इतकंच नाही तर मारहाणदेखील व्हिडीओमध्ये दिसते. सध्या अशीच एक घटना एका घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत बायकोनं भररस्त्यात नवऱ्याबरोबर धक्कादायक कृत्य केलं. नेमकं असं घडलं तरी काय, जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ (Husband Wife Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला तिच्या नवऱ्याचा भररस्त्यात छळ करतेय. सगळ्यांसमोर ती त्याला चपलेने मारतेय. ती मारत असताना तो शांतपणे सगळं सहन करतोय. भररस्त्यात हे धक्कादायक कृत्य बायको अगदी बिनधास्तपणे करताना दिसतेय. पण, यामागचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालं नाही. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हेदेखील अद्याप कळू शकलेलं नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @0_mahi_07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला “विचार करून लग्न करा. एक चुकीचा निर्णय आणि पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तर “निवड चुकली की, आयुष्याच्या पत्रावळ्या व्हायला वेळ लागत नाही, असंही या व्हिडीओवर लिहिलं आहे.” दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच ३४ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया (Wife Hits Husband Video)
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “कारण नसताना कोण मार खाणार नाही. नक्कीच काहीतरी कारण असणार” तर दुसऱ्याने कमेंट करrत लिहिलं, “नवरा कितीही वाईट असला तरी त्याच्याशिवाय घर चालू शकत नाही”, तर एकाने ”मुलांनो लग्न विचार करून करा. कारण- मग अवस्था खूप वाईट होते”, अशी कमेंट केली.