ऑफिसमध्ये गेलं की, काम एके काम हे असतंच. पण, त्यामध्येही कर्मचाऱ्यांसाठी विरंगुळा म्हणून अनेकदा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमात अनेकदा खेळ खेळले जातात, गाणी गायली जातात आणि डान्सही केला जातो.

ऑफिसमधले अशा कार्यक्रमांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, सध्या ऑफिसमधला एक आश्चर्य वाटेल असा एक व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी ऑफिसमध्ये अश्लील डान्स करताना दिसतेय.

तरुणीचा व्हायरल व्हिडीओ

तरुणीचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका ऑफिसमध्ये एक तरुणी डान्स करताना दिसतेय. सगळ्यांसमोर ती अचानक डान्स करू लागते. ते पाहून ऑफिसमधले कर्मचारी तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करतात. डान्स करता करता अचानक ती तिच्या बॉसचा हात पकडते आणि त्याला डान्स करण्यासाठी घेऊन येते. डान्स करता करता ती त्याला मिठी काय मारते, त्याचा हात काय धरते; पण तिचा हा सगळा अश्लील प्रकार सुरू असताना तो तिला हातदेखील लावत नाही आणि तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो.

तरुणीचा हा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @reels_marathii या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला “जगाच्या कोणत्या कोपऱ्यात असते राव असले ऑफिस” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल एक मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया या बॉस कर्मचाऱ्याच्या व्हिडीओवर दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “भाऊ घाबरला आहे; जर घरी व्हिडीओ बायकोने पाहिला तर…” तर दुसऱ्याने, “असं वाटतंय हा मॅनेजर किंवा बॉस आहे हे नक्की”, अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “त्या माणसाला पाहून त्याच्यासाठी आदर वाढला.” एकाने कमेंट करीत लिहिलं, “जॉब व्हॅकन्सी आहे का इथे? कमी पगार असेल तरी चालेल.”