Shocking video: राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या एका धक्कादायक घटनेत, एका रॅपिडो ड्रायव्हरने राइड वेळी तरुणीसोबत गैरकृत्य केले आहे. तरुणीने या घटनेचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय, हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

बेंगळुरू येथील तरुणीने व्हिडिओ शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे. ही तरुणी पीजीवर रुमवर जाण्यासाठी रॅपिडो बाईक बुक करते. पण तिच्यासोबत जे घडते ते धक्कादायक आहे. ६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली आहे. तरुणीने रॉपिडो राइड बूक केली होती. लोकेश नावाचा ड्रायव्हर या तरुणीला घेण्यासाठी आला. पण बाईक राईड दरम्यान लोकेश सतत तरुणीच्या पायांना हात लावत होता. तरुणी प्रचंड घाबरलेली होती. याच वेळी तिने या घटनेचा व्हिडिओ शूट केला.

व्हिडिओ मध्ये पाहू शकता की, ड्रायव्हर लोकेश तिच्या पायाला हात लावताना दिसत आहे. तरुणीनी देखील रडताना दिसत आहे. तरुणीने सांगितले की, ती घाबरली असल्याने आणि त्या एरियामध्ये नवीन असल्याने तिने गाडी थांबवण्यास देखील सांगितले नाही. यानंतर उतरल्यावर तिथे असलेल्या एका व्यक्तीला तिने या घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्या दुसऱ्या व्यक्तीने ड्रायव्हराला फटकारले. तरुणीची माफी देखील मागायला लावली. हा सर्व घडलेला प्रकार तरुणीने कॅप्शनमध्ये शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ s4dhnaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.