Shocking video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात, यात काही हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. सध्या एक असा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुम्हालाही संताप येईल. अनेकदा तुम्ही लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की प्राणी हेच माणसांचे सर्वात जवळचा मित्र असतो. त्यांच्या इतकं ईमानदार कोणीच असू शकत नाही. मात्र, अनेक लोक असे असतात ज्यांना प्राण्यांबद्दल अजिबातही प्रेम वाटत नाही. प्राण्यांना त्रास देण्यात त्यांना मजा येते. नुकताच असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे

सिंधुदुर्गमधील बांदा येथून समोर येत असून इथे ओंकार हत्तीला सुतळी बाॅम्बने हल्ला करण्याची घटना घडून आली आहे. “ओंकार हत्ती” हे एकरानटी हत्ती आहे जो सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर फिरतो. हा हत्ती तुळसाण येथील नदीत आंघोळ करत असताना त्याच्यासोबत हा प्रकार घडून आला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृश्यांनी सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

ओंकार हत्ती नदीच्या पाण्यात शांतपणे अंघोळ करत असताना काही व्यक्तींनी त्याच्या शेजारीच पाण्यात चक्क ॲटम बॉम्ब फेकले. त्या आवाजाने आणि फटाक्यांमुळे ओंकार हत्ती भेदरल्याचं दिसून आलं. तो फटाक्यांच्या आवाजाच्या भीतीने पाण्याच्या काठापासून पाण्याच्या आतल्या बाजुला जाताना दिसतो, ही घटना बांदा येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला असून प्राणी प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे, या घटनेनं प्राणीप्रेमी आक्रमक झाले असून या संतापजनक कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे. बॉम्ब फेकून हत्तीला इजा झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल प्राणीप्रेमींनी वनविभागासमोर उपस्थित केला आहे. दोन दिवसांपूर्वी ओंकार हत्तीला दांड्याने मारहाण केली होती, त्यानंतर आता चक्क ॲटम बॉम्ब फेकले आहेत. फटाके वाजल्यानंतर तिथे असलेल्या आणि हे संतापजनक कृत्य करणाऱ्यांनी मोठ्याने आवाज केला, या सर्व घटनेवेळी ओंकार हत्ती घाबरला असल्याचं दिसून आलं.

पाहा व्हिडीओ

आधी दांड्याने मारहाण झाल्यानंतर तो हत्ती थोडा बिथरला होता. तो अनेकांचा पाठलाग करत आहे. त्यानंतर आता पाण्यात शांतपणे अंघोळ करत असताना त्याच्या अंगावर फटाके फेकण्याचा प्रकार झाल्यामुळे असाच प्रकार सुरू झाल्यास तो चिडल्यास त्याच्याकडून मनुष्य आणि किंवा जीवितहानी होऊ शकते, अशी शक्यताही प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे.