Shocking Video Viral : मद्यपी लोक कधी काय करतील हे सांगता येत नाही. अशा नशेबाज लोकांना काही वेळा आपण काय करतोय याचंही भान नसते. अनेकदा ते असे काही वागतात की, पाहताना इतरांना भीती वाटते. नशेच्या धुंदीत त्यांना स्वत:चे आणि अवतीभवतीचे भान राहत नाही. अशा व्यक्तींना आपण करतोय ते योग्य की अयोग्य हेही समजत नाही. या दारूच्या नशेत ते आपला जीव धोक्यात घालायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. अशाच प्रकारे दारूची नशा एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. त्या तरुणाचा दारूच्या नशेत रस्त्यालगतच्या स्टॉलवरील दुधाच्या कढईवर तोल गेला. यावेळी गरम दूध अंगावर पडून, त्याचा अतिशय वेदनादायी मृत्यू झाला. या दुर्घटनेचा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ही दुर्घटना आहे. तिथे दारूच्या नशेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंगावर गरम दुधाची कढई पडल्याने तो अक्षरश: पूर्णपणे भाजला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले; पण त्याचा मृत्यू झाला. पण नेमके काय घडले ते जाणून घेऊ…

अंगावर उकळत्या दुधाची संपूर्ण कढई उलटली अन्…

G

ही दुर्घटना कानपूरच्या बाबू पूर्वा पोलीस ठाणे परिसरात असलेल्या एनएलसी चौकी भागात घडली. रस्त्याच्या कडेला असलेल्या हरीओम स्वीट्सबाहेर गरम दुधाचा स्टॉल होता. यावेळी दारूच्या नशेत तर्रss झालेला एक तरुण तिथे आला, त्याला नीट चालता येत नव्हते. वेडावाकडा कसाही रस्ता दिसेल तसा चालत तो दुधाच्या कढईजवळ पोहोचला. यावेळी उकळत्या दुधाच्या कढईवर तोल गेला आणि त्याच्या अंगावर संपूर्ण कढई उलटली. त्यामुळे तो गंभीररीत्या भाजला. उकळते दूध अंगावर पडल्याने तरुण जमिनीवरच वेदनेने तडफडत होता, यावेळी आजबाजूला काही लोक उभे होते; मात्र कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. त्यानंतर एनएलसी चौकीचे प्रभारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले; पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मुलींचे नकार पचवून वैतागल्याने शेवटी ‘बाहुली’शी केलं लग्न! अजब प्रेमाची गजब कहाणी; पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गरम दुधाची कढई नशेबाज तरुणाच्या अंगावर पडताना दिसत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे,