Mumbai Ac local video: मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वांत कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यांमुळे ही गर्दी वाढत आहे. मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्यात आता एक नवा गर्दीचा व्हिडीओ पाहून तर नव्या प्रवाशाला धडकीच भरेल; मात्र रोजच्या प्रवाशांना हे काही नवीन नाही. दरम्यान, या गर्दीपासून सुटका मिळावी यासाठी अनेक जण आता एसी ट्रेनचा पर्याय निवडताना दिसतात. मात्र, मुंबईतल्या एका स्टेशनवरचा एसी ट्रेनचा हा व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्या; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

मुंबईत दर दिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या साधनाचा फायदा घेताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकीट काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं. एसी लोकलमध्येही हल्ली असा फुकटचा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एसी ट्रेनचं तिकीट सामान्य लोकलच्या तुलनेत जळपास १० पट महाग आहे. तरीसुद्धा इतकं महागडं तिकीट काढूनही मुंबईकरांना उभ्यानं लोंबकळत, हाणामाऱ्या करीत प्रवास करावा लागतोय. अन् याचीच प्रचिती देणारा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की डब्यात चढण्यासाठी प्रचंड गर्दी दिसत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी दिसत आहे की, त्यामध्ये चेंगराचेंगरीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, तरीही सगळेच ट्रेनमध्ये चढण्यासाठी घाई करीत असताना दिसतात. प्रवाशांची एवढी गर्दी आहे की, एसी लोकलचे दरवाजे बंद करण्यात लोको पायलटला विचार करत आहेत. एकच डब्ब्यात अशी अवस्था नाही तर व्हिडिओत तुम्हाला प्रत्येक डब्ब्यात सारखी अवस्था दिसून येत आहे.आता तुम्हीच सांगा एवढ्या गर्दीत चढायचं तरी कसं? एवढंच नाही, तर ट्रेनमध्ये असणाऱ्यांनाही या गर्दीत उतरायला मिळत नाहीये. त्यामुळे एवढं महाग तिकीट काढून उपयोग काय, असा सवाल प्रवासी करीत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; पत्रिकेवरील एका गोष्टीनं वेधलं लक्ष; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर @incmumbai नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका युजरने त्यावर प्रतिक्रिया देत, “हा आजचा मुद्दा नाही, तर ही रोजची समस्या आहे. तसेच एसी लोकल वेळेवरही येत नाहीत. तिकिटे तपासण्यासाठी कधी टीसीसुद्धा येत नाहीत. त्यामुळे एसी ट्रेनबाहेर पास स्कॅनर लावला पाहिजे; जेणेकरून लोक या ट्रेनमध्ये कोणत्याही अडचणीशिवाय चढू शकतील.” तर दुसऱ्या युजरने “प्रवाशांना याचा रोज त्रास होतो”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.