Shocking Viral Video : सापाचं नाव ऐकले तरी काळजात धडकी भरते. सापाच्या एका दंशाने माणसाचा क्षणात मृत्यू होऊ शकतो, म्हणून विषारी-बिनविषारी कोणताही साप असला तरी लोक त्यापासून अंतर ठेवून राहतात. तर काही जण सापांबरोबर खेळ करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं अवघड होईल. या व्हिडीओत चिमुकल्याच्या हाताला सापाने वेटोळा घातल्याचे दिसत आहे. यात आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे साप चिमकुल्याच्या हातावर पकड घट्ट करत असताना त्याचे कुटुंबीय व्हिडीओ शूट करत होते.

लांबलचक सापाने चिमुकल्याच्या हाताला वेटोळा घातला अन्….

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका लांबलचक सापाने चिमुकल्याच्या हाताला वेटोळा घातला आहे, चिमुकला खूप घाबरलेल्या अवस्थेत दिसतोय. तो स्वतःला सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतोय, पण साप त्याच्या पायाला वेटोळे घालू लागतो. यावेळी चिमुकला कसा बसा उठला आणि त्याने सापाला पायापासून दूर केले, पण सापाने त्याच्या हाताभोवतीचा वेटोळा काही सोडला नाही. यावेळी तिथे काही लहान मुलं आणि दोन मोठे तरुणदेखील उभे आहेत. पण, त्यापैकी कोणीही त्या निष्पाप चिमुकल्याची मदत करत नाही. यानंतर व्हिडीओच्या शेवटी एक व्यक्ती ज्ञान देताना दिसतोय की, यातून तुम्हाला काय शिकवण मिळते की, तुम्ही अडचणीत असता तेव्हा लोक तुमची साथ देत नाही तर फक्त उभं राहून तमाशा पाहतात. त्यामुळे लोकांनी आपल्या अडचणी आपणच सोडवायच्या, कोणावर अवलंबून राहायचे नाही.

हा अतिशय धक्कादायक व्हिडीओ @vivek_choudhary_snake_saver नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. हे अकाउंट मुलाच्या कुटुंबातीलच कोणाचे तरी आहे. दरम्यान, व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याला वाटले की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्याचे कौतुक करतील पण घडले उलटे. लोकांना व्हिडीओ पाहिल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या युजरने पोस्टवर कमेंट करत दावा केला आहे की, व्हिडीओमध्ये दिसणारा साप हा धामण आहे, जो विषारी नाही, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. त्या व्यक्तीने असेही म्हटले की, अनेकदा लोक या सापाला विषारी समजून मारतात, पण खरंतर ते खूप फ्रेंडली असतात. दरम्यान, युजर्सना मात्र हा व्हिडीओ अजिबात आवडलेला नाही.

View this post on Instagram

A post shared by Vivek Kumar (@vivek_choudhary_snake_saver)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने म्हटले की, विषारी नसला म्हणून काय झालं. ही रील पाहिल्यानंतर दुसरं कोणतं मूल सापाजवळ गेले तर. दुसऱ्याने लिहिले की, अरे, या मुलाला सापापासून लवकर दूर करा, तिसऱ्याने लिहिले की, लहान मुलांना चांगला आणि वाईट यातला फरक समजत नाही, पण कुटुंबातील सदस्यांनी जरा शहाणपणाने वागले पाहिजे. अनेकांनी हा पालकांचा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे.